Breaking News

1/breakingnews/recent

12 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


१. नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता देणार आहेत. 14 मे रोजी ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. त्यावेळी याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

२. हमासने इस्रायलवर डागले 130 रॉकेट
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. हमासने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासने इस्रायलवर 130 रॉकेट डागली असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मूळ केरळची असल्याची माहिती मिळालीये.

३. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांवर गोळीबार
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बनसोडे यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नाही आणि ते सध्या सुखरूप आहेत.

४. तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांचं अमेरिकेतून मोफत मार्गदर्शन
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या अपुरी पडते आहे. वेळेत आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. भारतातील ही परिस्थिती पाहून अमेरिकेतील मराठी डॉक्टरांनी भारतातील कोरोना रुग्णांसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

५. खा.रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल
वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

६. ५४ जणांवर गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे शहर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या युवा संघटनेचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी १० मे रोजी पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

७."आमच्या हेतूंविषयी काही राज्य तक्रार करतात"
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकनं तयार केलेली Covaxin या दोन लसींचे डोस सध्या भारतात दिले जात आहेत. त्यामध्ये मोठा हिस्सा कोविशिल्डचा असला, तरी कोवॅक्सिनही मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. मात्र, कोवॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार काही राज्यांकडून करण्यात आली होती. त्यावर आता Bharat Biotech च्या सहायक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करून कंपनीकडून नाराजी व्यक्त केली आहे. “हे फार वेदनादायी आहे”.

८. हत्याकांडाचं रहस्य उलगडणार
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात हरियाणाच्या कुस्तीपटूची हत्या झाली आणि पोलिसांच्या हाती न लागलेला ऑलम्पिक पदक विजेता सुशील कुमार अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सुशील कुमारचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिकची दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमार याच्याविरुद्ध 'लूक आऊट' नोटीस बजावली आहे. 

९. एएमयु मध्ये कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू
कोरोनाच्या महामारीचा कहर देशात सुरु आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांचं अपरिमित नुकसान होतंय. देशात अशा नुकसानीच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातलं ऐतिहासिक अलीगढ मुस्लीम विद्यापीठ…गेल्या 20 दिवसांत या विद्यापीठातले तब्बल 26 प्राध्यापक कोरोनाचे बळी ठरलेत. अवघ्या 20 दिवसांत   26 प्राध्यापक, 18 शिक्षकेतर कर्मचारी…एकाच विद्यापीठात अशा एकूण 44 जणांचा मृत्यू झालाय.

१०. केंद्राने मोफत लस देत असल्याचे खोटे सांगितले
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे.  केंद्राने मोफत कोरोना लस देत असल्याचे खोटे सांगितले. तसेच केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे लोकशाहीला मारक आहे. न्यायालयाला काही समजत नाही, असे त्यांना वाटते आहे. संविधान न मानणारे हे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *