Breaking News

1/breakingnews/recent

13 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री पून्हा एका वाघाच्या नवजात बछड्याचा व अस्वलीचा दुर्दैवी मृत्यू...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

  

१. शिवसेनेने पुढाकार घेऊन दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला पाहिजे-आमदार गणपत गायकवाड !
 नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा विषय सध्या ठाणे रायगड जिल्ह्यात चांगलाच गाजू लागला आहे.  
 आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जागा आरक्षित करून सरकारने  ताब्यात घेतल्या  होत्या.आता या विमानतळाचे नाव हे लोकनेते दिनकर  बाळु  पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं अशी मागणी भूमिपुत्रांची आहे. मात्र शिवसेनेनं या भूमिपुत्रांच्या मागणीला बाजूला सारत सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची तयारी केलीये.

२. लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर अत्याचार
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाजनगर फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर  परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन लैंगिक अत्याचार करणाºया रोहन राजेंद्र खाजेकर या आरोपीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३. जालन्यात मराठी चित्रपट कलावंताकडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन
जालन्यात मराठी चित्रपट कलावंताकडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेय...कोरोना महामारीमुळे मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार,तंत्रज्ञ, कामगार, दिग्दर्शक यांना शासनाकडुन आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलेय.

४. आरोग्य मंत्री यांच्या अंबड तालुक्यात लस मिळत नसल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप
आरोग्य मंत्री यांच्या अंबड तालुक्यात लस मिळत नसल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येतोय... आरोग्य सेतु वर लस बुकच होत नसल्याने नागरीक हवालदिल झाल्यात...18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण दोन दिवसांपासून बंद आहे.

५. पून्हा एका वाघाच्या नवजात बछड्याचा व अस्वलीचा दुर्दैवी मृत्यू
भंडारा तालुक्यातील,गराडा/ बूज येथे वाघाचे दोन बछडे , कालव्याच्या सायफेन टाक्यामध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरासह सर्वत्र एकच  खळबळ उडाली असताना, अवघ्या काही तासातच,पून्हा भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बीट येथे वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना उघडकीस आली.तर तिसऱ्या घटनेत, भंडारा वनविभागा -अंतर्गत खापा राउंडच्या कक्ष क्रमांक 286 मध्ये, एका नर अस्वलाचा मृतदेह आढळून आला. 

६. भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.  यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीतही राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. 

७. पुण्यातील जम्बो मध्ये तरुणीचा मृत्यू .. गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण
पुण्यातल्या जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये २५ वर्षीय बहीणीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलने चक्क खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीये . आपल्या बहीणीशी वॉर्ड बॉयने गैरवर्तणूक केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

८. पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण!
 राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार झाल्याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आमदार बनसोडे यांच्या मुलाच्या विरोधात निगडी व पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

९. प्रत्येक प्रभागात करोना नियंत्रण कक्ष
वसई - विरार येथे  करोनाबाधितांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी पालिकेने आता सर्व नऊ प्रभागांत करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहेत. रुग्णांना रुग्णालयात खाटा आणि त्यांना योग्य उपचार आणि औषधे मिळवून देणे तसेच तसेच घरीच औषधोपचार करणाऱ्या रुग्णांनादेखील कक्षामार्फत वैद्यकीय साहाय्य मिळवून दिले जाणार आहे.

१०. अकोला येथील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाची बोळवण
अकोला येथे  वैद्यकीय शिक्षण विभागाने शहरातील ‘सुपर स्पेशालिटी’च्या इमारतीत करोना  रुग्णालय सुरू करण्याला मंजुरी देऊन अति-विशेषोपचाराच्या मूळ उद्देशालाच छेद दिला.  ‘सुपर स्पेशालिटी’ची इमारत गेल्या  दोन वर्षांपासून धूळ खात पडून होती. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *