Breaking News

1/breakingnews/recent

12 मे Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - या परिसरात आढळले वाघाच्या पायाचे ठसे....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. संतप्त नागरिकांनी सिडको पाणी वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप
औरंगाबाद सिडको वाळूजमहानगर परिसरात व नवीन म्हाडा कॉलनीत पिण्याच्या पाण्याची सगळीकडे बोंबाबोंब असल्याने नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त महिला, नागरिकांनी आज मंगळवार  सिडको कार्यालयास कुलुप ठोकुन अधिकारी व कर्मचाºयांना तासभर कोंडून ठवले होते.

2. गंगापूर शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां दुकानांवर कारवाई
राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन'अंतर्गत नियमावली जाहीर केली आहे.या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.त्यानुसार प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

3. 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीची शासनानेकडे मागणी !
कल्याण :- दहिसर - नावाळी गावात प्रशस्त असे शासकीय रुग्णालय आहे, परंतू गेले कित्येक वर्ष ते बंद असल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागत असून कोरोना काळात नागरिकांची गैरसोय होत आहे. लसीकरण किंवा उपचारासाठी नागरिकांना निळजे आरोग्य केंद्रावर धाव घ्यावी लागत आहे. 

4. घराच्या छतावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यु झाला.
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या रांजणगावात घराच्या छतावरुन तोल जाऊन खालीपडून गंभीर जखमी झालेल्या रांजणगावातील एका २६ वर्षीय तरुणाचा सोमवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला आहे. गोवर्धन मुरलीधर भोसले असे मयत तरुणाचे नाव आहे.

5. म्युकोरमायकोसिसचा डोंबिवलीत शिरकाव !
कोरोनाइतकेच मोठे संकट ठरण्याची शक्यता असलेल्या म्युकोरमायकोसिस या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत.रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे.मात्र म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. 

6. किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस मारहाण
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवार रात्री ८ वाजेच्या सुमारास कमळापूर शिवारातील आसाराम बापुनगरात घडली. या प्रकरणी चौघाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,

7. आरोपी अटक नं झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा    
घंनसावगी तालुक्यातील मौजे श्रीपत धामणगाव येथे बंसी मनोहर शिदे व इत्तर यांनी मागील एफ आय क्र 0109 चे साक्षीदार श्री विद्यासागर वाहुळे याच्या घरावर गावात बैठक घेऊन प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बौध्द समाजातील लोकांना राशन पाणी बंद करून बहिष्कुत केल्याने घनंसावंगी पोलिस ठाणे येथे रोजी बंसी व इतर 18 याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अद्यापही व्यवहारी गावात मोकाट फिरात आहेत.  

8. बेला परिसरात आढळले वाघाच्या पायाचे ठसे*
भंडारा शहरापासुन जवळ असलेल्या बेला गावाजवळील परिसरात, वाघाच्या पायाचे ठसे मंगळवारी काही नागरिकांना दिसून आले. याची माहीती नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांना दिली. वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचून, पाहणी केली असता, परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. 
 
9. आज 40 हजार 956 नवे रुग्ण सापडले, 71 हजारांहून अधिक रुग्ण बरे
 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्राला हळूहळू यश येताना दिसतंय. नवीन कोरोना संसर्गाच्या संख्येत सलग दुसर्‍या दिवशी लक्षणीय घट झाली आणि कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही नवीन कोरोना प्रकरणांपेक्षा खूपच जास्त आहे. मंगळवारी राज्यात 40 हजार 956 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर कोरोनामुक्तांची संख्या 71 हजार 966 झाली होती. तर राज्यात आज 793 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय.

10. कोठडीतील सचिन वाझेंना सर्वात मोठा झटका
मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी स्फोटकंप्रकरणात  आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. स्फोटके प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *