Breaking News

1/breakingnews/recent

11 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री राज्याचे मा.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


१. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती,
दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे; मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास अनुमती देण्यात आली होती; मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या करायचा नाहीत, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

२. पुण्यात दाखल होणार पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस!
पुण्यात अंगुल  येथून मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल होणार आहे. लोणी स्थानकावर बांधण्यात आलेल्या रॅम्पवर रात्री ऑक्सिजनचे चार टँकर उतरतील. हे व्हाया नागपूर ,दौंड मार्गे लोणीत दाखल होतील. पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस असणार आहे.

३. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलावीत
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्राने योग्य पावलं उचलावीत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.

४. राज्याचे मा.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५. सीरम इन्स्टिट्यूटची विनंती सरकारने फेटाळली
 कोविशील्ड लसीचे 50 लाख डोस यूकेला पाठवले जाणार नाहीत. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मागणी फेटाळली आहे. स्थानिक स्तरावरील लसीचा तुटवडा, भारतीयांची गरज आणि त्यांच्या सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

६. गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांमध्ये लसीकरणास परवानगी
 देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लोकसंख्या कोट्यावधींच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. 

७. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील १९ हजार नागरिकांवरील मृत्यूचं संकट टळलं
राज्यात सोमवारी दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळाले. दिवसभरात राज्यात ३७ हजार २३६ नविन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात मागील ४१ दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्या ही सोमवारी आढळून आली आहे. 

८. ठाकरे सरकार वर्षभर वसुलीत मश्गूल…
पुण्यात करोना लसनिर्मितीसाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकची सहकंपनी असलेल्या बायोवेटला पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द परिसरातील पूर्ण कार्यरत असलेला १२ हेक्टर जागेवरील कारखान्यात लसनिर्मिती सुरू करण्याचा परवानगी मिळाली. करोनाची सद्यस्थिती लक्षात घेता केवळ लसनिर्मितीसाठी परवानगी देण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केल्यावर न्यायालयाने कंपनीला या कारखान्यात लसनिर्मितीसाठी परवानगी दिली.

९. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
 दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी हे चक्रीवादळ पोषक स्थिती निर्माण करू शकते. मात्र, त्याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठा धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.

१०. भाईंदरमधील परमहंस कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द
 मीरा-भाईंदर शहरात रुग्णसंख्या वाढत असताना खासगी रुग्णालय हलगर्जीपणा करत असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यात भाईंदर पूर्व परिसरातील परमहंस या रुग्णालयाच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्युसंख्येत वाढ झाल्याचा ठपका ठेवत त्याची कोविड मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच, इतर रुग्णालयांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *