11 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - ग्लोबल टिचरच्या ट्रॉफीचं असं केलं स्वागत, डिसले गुरुजींना अत्यानंद....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. 2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा'
राज्यातील कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. सरकारनेही याबाबत दानशूर व्यक्तींना आवाहन केलंय. तसेच, राज्यातील सर्वच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक किंवा दोन दिवसांचे वेतन द्यावे, अशा सूचनाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
2. ग्लोबल टिचरच्या ट्रॉफीचं असं केलं स्वागत, डिसले गुरुजींना अत्यानंद
जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा 'ग्लोबल टिचर अॅवॉर्ड' पटकावल्यानंतर, सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींवर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. देशभरातून आणि परदेशातूनही त्यांच्या कामगिरीचं दिग्गजांनी कौतुक केलं. मात्र, कोविड महामारीमुळे हे सर्व ऑनलाईनच होत होतं. डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही.
3. "राम राज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले"
कोरोना संकटात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बक्सरच्या चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात मृतदेहांचा खच आढळून आला आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याची शक्यता येथील प्रशासनाने व्यक्त केली आहे.
4. 'कोव्हिशिल्ड' ब्रिटनमध्ये जबरदस्त प्रभावी ठरली; 80 टक्के मृत्यू घटले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामध्ये ब्रिटनमधूनभारतीयांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी येत आहे.ब्रिटनमध्ये जगातील सर्वाधिक प्रमाणावर वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले आहे. ऑक्सफर्ड- एस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेणाऱ्य़ा लोकांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
5. रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?
राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली, तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान मनसेने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?" असा संतप्त सवाल मनसेने केला आहे.
6. होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले तरी त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या महिन्याभरात घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती.
7. पुण्यात दाखल होणार पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस!
पुण्यात अंगुल येथून मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल होणार आहे. लोणी स्थानकावर बांधण्यात आलेल्या रॅम्पवर रात्री ऑक्सिजनचे चार टँकर उतरतील. हे व्हाया नागपूर ,दौंड मार्गे लोणीत दाखल होतील. पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस असणार आहे.
8. खाकीतील अवलियाने कोरोनाकाळात दिला ५००हून अधिक प्राण्यांना आधार
कोरोनाच्या काळात कर्तव्यापलीकडे जाऊन खाकीतील अवलिया मुक्या जिवांसाठी झटत आहे. या पोलीस अधिकाऱ्याने आतापर्यंत ५०० हून अधिक प्राण्यांना मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी प्राण्यांसाठी उभारलेल्या या लढ्यात पाल ग्रुप अंतर्गत दोन हजारांहून अधिक जणांची फौज तयार केली आहे.
9. दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट
दादर, माहीम आणि धारावी अशा मुंबईतील मध्यवर्ती व गजबजलेल्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला होता. मात्र, त्वरित चाचणी, तात्काळ निदान आणि योग्य उपचार या उपाययोजनांचा प्रभाव पुन्हा एकदा जी उत्तर विभागात दिसून येत आहे. गेले काही दिवस दररोज शंभरहून अधिक रुग्णसंख्या असलेल्या या विभागात सोमवारी ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत.
10. स्लॉटच बुक होत नाही, लसीकरण होणार तरी कधी?
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन बुकिंगच्या वेळा निश्चित नसल्याने लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत. काहींना आठवडा होऊ न गेला तरी स्लॉट मिळत नाहीत, तर काहींना काही क्षणात स्लॉट उपलब्ध होत आहेत. काही ठिकाणी स्लॉट बुकिंगसाठी फळीच उभारण्यात आल्याने सर्वसामान्यांना बुकिंगचा स्लॉटच मिळत नाही.
No comments
Post a Comment