11 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कुकडीच्या पाण्यासाठी आता न्यायालयीन लढा...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
\
TOP HEADLINES
१. कोपरगावात डुकरांच्या हल्ल्यात तिघे जखमी
शहरातील संजय नगर भागात पाळीव डुकरांनी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला करीत तीन जणांना चावा घेतल्याची घटना समोर आलीये. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२. जवळेकरांचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटला
गेल्या अनेक वर्षांपासून जवळे ग्रामस्थांना उन्हाळ्यात बर्डसवणारा पिन्याच्ता पाण्याचा प्रश्न यावर्षी मिटलाय. जवळे ग्रामपंचायतीने मार्ग काढत खोदलेल्या नवीन विहिरीस चांगले पाणी लागल्याने महिलांची होणारी वणवण थाम्बलीये.
३. मुळा च्या उजव्या कालव्यातून आज आवर्तन
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनाचे शेवटचे आवर्तन उद्या सकाळी सहा वाजता सोडण्यात येईल. राहुरी, नेवासा,पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांतील ३० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल, अशी माहिती धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिलीये.
४. विवाहितेवर अत्त्याचार करणाऱ्यास अटक
संगमनेर अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींनी ट्रस्ट असलेल्या ४५ वर्षांच्या विवाहित महिलेवर वारंवार अत्त्याचार करणाऱ्या भोंदूबाबास पोलिसांनी अटक केलीये. महिलेने दिलेल्या फिर्यादिवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
५. कुकडीच्या पाण्यासाठी आता न्यायालयीन लढा
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांने कुकडीच्या नियोजन आवर्तनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, आवर्तनास तात्पुरती स्थगितीही देण्यात आलीये. या याचिकेला आवाहन देत नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा सुरु केलाय. स्थगितीला शेतकऱ्यांच्या वतीने हरकत नोंदविण्यात आलीये.
६. नेवासातील ऑक्सिजन चा प्रश्न लवकरच मिटणार
नेवासा फाटा येतील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून त्यादृष्टीने राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गाढख यांनी प्रशासनाला याबाबाद सूचना दिल्या असल्याने लवकरच नेवासा तालुक्यातील ऑक्सिजन चा प्रश्न सुटणार आहे.
७. कामगारांसाठी कोरोना किट द्या
साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपत आल्याने शेवगाव आणि पाथर्डीतील हजारो ऊस तोडणी मजूर गावाकडे परतत आहेत. मात्र संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या तपासणीसाठी सर्व सरकारी दवाखान्यात अँटीजेन किट मुबलक उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीये.
८. शेतकऱ्यांना बी बियाणे द्या
संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगले काम करत असून खरीप हंगामात सर्व शेतकरी बांधवांना सर्व बी बियाणे, रासायनिक खाते, औषधें हे वेळेवर आणि मुबलक देण्याची तयारी कृषी विभागाने ठेवावी, अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीये.
९. साईबाबा सुपर रुग्णालय पूर्ववत सुरु करा
कोरोनाच्या महामारीत साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत. साईबाबा संस्थांच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कोव्हीडरुग्णांना साईनाथ रुग्णालयात शिफ्ट करून तिथे अद्यावत उपचार करावेत, तसेच साईबाबा साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णानालाय कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठी पूर्ववत सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी संस्थांचे मुक्या कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याकडे केलीये.
१०. अगस्तीच्या गैरकारभाराची चौकशी होईपर्यंत संचालक घुले यांचा राजीनामा मंजूर करु नये
गैरव्यवहार व कारभारामुळे अगस्ती साखर कारखाना मोडीत निघू नये, म्हणून सभासद या नात्याने आमची धडपड असून, अगस्तीच्या कारभाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर करु नये, अशी मागणी शेतकरी नेते साथी दशरथ सावंत यांनी केली.
No comments
Post a Comment