11 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात मुंडन आंदोलन....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. सालेभाटा येथे विहिरीत पडलेल्या अजगराला जिवनदान
भंडारा जिल्हयाच्या लाखणी तालूक्यातील सालेभाटा, गावात एका ग्रामस्थाच्या घरच्या 30 फूट खोल विहिरीत, पडलेल्या अजगर प्रजातीच्या सापाला ग्रीनफ्रेंड्सचे निसर्गमित्र- सर्पमित्र पंकज भिवगडे,मयूर गायधने,दर्वेश दिघोरे व वनविभागाची रेस्क्यू टीम तसेच मानद अधिकारी आदींनी, दोन दिवस परिश्रम घेवून, सुरक्षीत विहीरीतून बाहेर काढून, सुटका केली. निसर्गमित्र-सर्पमित्र यांनी प्रयत्न करुन, अजगराला विहीरीतून बाहेर काढण्यात यश मिळविले.
2. सचिन कांबळे यांच्याकडून आंपग गोरं गरीबाना किराणा वाटप
बाळासाहेब आंबेडकर याच्या वाढदिवसाच्या निमित्त सचिन कांबळे यांनी आंपग गोरं गरीबाना किराणा वाटप केले .राज्यात लाँकडाऊन जाहीर केले गरीबानाच्या हाता काम नाही परिस्थिती बिकट झाली यांची दखल वंचित बहुजन आघाडीचे सचिन कांबळे यांनी घेतली कांबळे यांनी बोलताना म्हणाले लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगर सेवक यांनी वार्डाच्या समास्या सोडविल्या पाहीजे त्याना वाऱ्यावर सोडले नाही पाहिजे असे वक्तव्य कांबळे यांनी केले.
3. लोधी आवारात दोन गटात तुफान दगडफेक
जालना शहरातील लोधी आवारात सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान,परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे सूत्रांकडून समजते.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे देविदास शेळके यांनी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह धाव घेतली.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार देखील करावा लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
4. कल्याण-डोंबिवलीत लसीकरणावरून भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप !
कल्याण-डोंबिवलीत सर्वत्र लसीकरणानासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या शहराला राज्य शासन फक्त बाराशे लसी पुरवत आहे अशी टीका आमदार रविंद चव्हाण यांनी राज्य सरकार वर केली आहे.तसेच लसीचा पुरवठा कोणत्या राज्याला किती करायचा हे केंद्र सरकार ठरवते असते.असे सांगत यासर्व घटनेवर चोराच्या उलट्या बोंबा असे वक्तव्य शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केले आहे.
5. औरंगाबाद पुणे महामार्गावरील कायगाव टोका येथे अपघात ,वाहन चालकाचा जागीच मृत्यू
काल १० मे रोजी दुपारी एक वाजता औरंगाबाद पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील जिल्हा नाकाबंदी जवळ औरंगाबादहून अहमदनगर कडे गणेश रोड लाईन कंपनीचा बारा टायरचा ट्रक च्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवुन जामगाव येथुन प्रवरासंगमकडे शाईन मोटारसायकलवर बसुन जात असलेल्या प्रदीप मगर याला पाठीमागून धडक दिली या धडकेत मोटारसायकल विरुद्ध दिशेला पडली तर यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
६. शुल्लक कारणावरून कुर्हाड व लाठ्या काठ्यांनी मारहाण
जिकठाण शिवारातील मिराबाई वखुरे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारी राजू खोमणे यांची शेत जमिन आहे. रविवारी सरपण टाकण्याच्या कारणावरून वाखुरे व खोमणे यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी राजू खोमणे, अमोल खोमणे व विठ्ठल खोमणे यांनी जीवे मारण्याची धमकी दित कुर्हाड व लाठ्याकाठ्याने मारहाण केली. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मीराबाई हरिचंद्र वाखुरे, कडूबाळ यादव वाखुरे, सोमनाथ वाखुरे व मुलगी अनिता वाखुरे.
7. लॉकडाऊनमुळे टँकर चालक आर्थिक आडचणीत
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत लॉकडाऊनमुळे टँकर चालकाचा व्यवसाय आडचनीत आला आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊसामुळे यंदा वाळूजमहानगरातील पाणी टंचाईचे संकट टळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुबलक जलसाठा असला तरी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने उद्योगनगरीतील टँकर चालकांचा व्यवसाय पुुर्णपणे बुडाला आहे.गतवर्षी संपुर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसिंचन प्रकल्प काठोकाठ भरुन वाळूज परिसरातील शेतकरी व नागरिकासाठी वरदान ठरलेला टेंभापुरी मध्यम प्रकल्पही दशकभरानंतर गतवर्षी १०० टक्के भरला होता.
८. ऑक्सीजन प्लांट चे उद्घाटन सि.पी.त्रिपाठी यांच्या हस्ते
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या वाळूज ते कमळापुर रोड लगत आसलेल्या
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत कोविड सेंटर साठी ऑक्सीजन प्लांट चे उद्घाटन सोमवारी १० मे रोजी दुपारी एक वाजता जानकीदेवी बजाज फाउंडेशनचे सि.पी.त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले .त्यामुळे येथे कोरोनाच्या रुग्णासाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन हे जागेवरच तयार करून रुग्णांच्या बेडपर्यंत देण्यात येणार आहे.
९. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ तसेच पाणी वाटप.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना व परीसरात फिरणार्या अनाथ लोकांना फळ व पाणी वाटप करण्यात आले, यावेळी कृष्णा बनकर, सतीश गायकवाड, पंकज बनसोडे सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.
10. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात मुंडन आंदोलन.
राज्ज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी G R काढून पदोन्नती आरक्षण रद्द कले यालाच विरोध म्हणून औरंगाबाद येथील भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजव आज आंबेडकरवादी अत्याच्याराविरोधी कृती समितीच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आल्या यावेळी विविध घोषणा देऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी आंबेडकरवाद्यांकडून होत आहे.
No comments
Post a Comment