Breaking News

1/breakingnews/recent

10 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - प्रशासनाची कारवाई आणि भाजीबाजार झाला बंद...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. प्रशासनाची कारवाई आणि भाजीबाजार झाला बंद
सुप्यातील पारनेर रोड, बाजारतळ चौक ते शहजापूर चौकापर्यंत भाजी विक्रेते थांबल्याने त्यांच्याभोवती वाढलेल्या गर्दीतून सुप्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. यामुळे सुपा येथे प्रशासनाने कारवाई सुरू करताच भाजीबाजार बंद झाला आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत पातळीवर प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. 

2. लसीकरणात दुसर्‍या डोससाठी प्राधान्य द्यावे
लसीकरणात पहिला डोस देऊन ज्यांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपली आहे अशा लोकांना व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करा. पहिल्यांदा ज्यांना लस दिली गेली आहे. अशा 70 टक्के लोकांना दुसरा डोस द्यावा व 30 टक्के लोकांना पहिला डोस द्यावा, अशा सूचना ग्रामविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. 

3. पूनावाला यांना दिलेल्या धमक्या तपासाचा भाग
लस निर्मितीच्या रूपाने आदर पूनावाला यांनी चांगले काम केले आहे. त्यांना धमक्या कोणी दिल्या? आणि का दिल्या? हा तपासाचा विषय आहे. असं मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केलंय. थोरात यांनी शनिवारी शिर्डी कामकाजाचा आढावा घेतला आहे.

4. शंभर रुग्णांना मागे 17 रेमडेसीविर
 अहमदनगर शहर आणि तालुक्यातील 100 रुग्णांच्या मागे फक्त 17 रेमडेसीविर इंजेक्शन मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाले आहे.  रेमडेसीविरचा कोठा कमी मिळत असल्याने खाजगी डॉक्टरांकडून पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठ्या लिहून दिल्या जात आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 27 हजार कोरोना सक्रिय आहे. 

5. पतीला मारहाण करीत पत्नीच्या गळ्यातील दागिने ओरबडले
 शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे चोरट्यांनी पतीला मारहाण करीत पत्नीच्या गळ्यातली 60 हजार रुपये किमतीचे दागिने ओरबडून नेले.. आठ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात मनीषा राजेंद्र कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6. 12 दिवसांपासून पाथर्डी शहरासह अनेक गावांचा पाणीपुरवठा खंडित
पाथर्डी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बेकायदा बेजबाबदारपणा सुरु असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटत असून यामुळे पाथर्डी शहरासह ग्रामीण भागात अनेक गावांचा पाणीपुरवठा खंडित आहे. 

7. रुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय  नाही.
कोरोणाच्या दुसऱ्या लाटी ची  दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोणा बाधित आढळून येत आहे. रुग्ण जरी मोठ्या प्रमाणावर निष्पन्न होत असली तरी आरोग्य विभागाला येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्या जात आहे. त्यामुळे रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. याची काळजी घ्या प्रत्येक बाधित हे फक्त माझ्या मतदारसंघातील आहे. अस नाही तर ते माझ्या परिवारातील सदस्य आहेत. 

8. चव्हाण यांचा राजीनामा मागणारे राजकारणी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सरकार म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षण रद्द करण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांना राजीनामा द्या म्हणणारे आता राजकारण करीत असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

9. युवकावर हल्ला चौघांवर गुन्हा
हनुमान वाडी येथील मुख्य चौकात का युवकावर तलवार चाकू आणि कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला याप्रकरणी युवकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कुसळकर यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला

10. जिल्हावासियांना सलग दुसऱ्या दिवशी हि दिलासा
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांना पेक्षा कोरोनातून बरे होणारे रुग्ण सध्या जास्त झाले आहे. दिवसभरात तीन हजार 799 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3327 नवीन बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असते त्यांची संख्या 25 हजार 928 इतकी झाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *