1८ मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हर्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समधील ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते.
2. राज्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या ५ हजारांवर जाण्याची भीती
येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ५ हजार होईल असा अंदाज राज्य आरोग्य हमी सोसायटीने व्यक्त केला आहे. त्यापैकी ७५ टक्के रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करता येतील. त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
3. पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चिन्हे आहेत. मुंबईत सध्या ३५ हजार ७०२ सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईतील १७८ पालिका आणि खासगी रुग्णालयांमधील तब्बल दहा हजार ९८४ खाटा रिकाम्या आहेत, यात अतिदक्षता विभागातील ३७० तर १०४ व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे.
4. जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा
जिद्द आणि चिकाटी असेल तर कठिणातले कठीण ध्येय साध्य करता येते, हे मुंबईतील ३० वर्षीय महिलेने दाखवून दिले आहे. तिने उच्च रक्तदाब आणि कावीळवर मात करत जुळ्या मुलांना जन्म दिला. इतकेच नव्हे तर मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच बी. एड्.ची परीक्षा दिली.
5. मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका!
काही दिवसांपूर्वी उकाड्यामुळे हैराण होणाऱ्या मुंबईकरांना अचानक वादळाला सामोरे जावे लागत आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे. या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला, दमा अशा आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
6. पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच!
राज्य शासनाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत लस प्राप्त न झाल्याने उद्याही शहरातील सर्व लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण ठप्प असून रविवारी फक्त १५ केंद्र सुरु होते.
7. दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार
कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नादारी व दिवाळखोरी संहितेला आणखी स्थगिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. बँका तणावातील कर्जांची पुनर्रचना करू शकतात, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
8. मी जिवाभावाचा साथीदार गमावला
आता गावखेड्यातही कोरोनाची चांगलीच भीती पसरली आहे. आपल्या आप्तस्वकीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या निधनाने सर्वचजण दु:खात आहे. सोशल मीडियातून या वेदनादायी दु:खी भावनाही व्यक्त होत आहेत. आता, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही जिवलग मित्र गमावला आहे. त्यानंतर, त्यांनीही सोशल मीडियातून भावपूर्ण श्रद्धांजलीची भावूक पोस्ट केली आहे.
9. देशात नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्याही खाली
देशात सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत आणखी घसरण होऊन ती ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. २४ तासांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा हा गेल्या २७ दिवसांतील नीचांक आहे. देशात सोमवारी कोरोनाचे २ लाख ८१ हजार ३८६ रुग्ण आढळून आले, तसेच ३ लाख ७८ हजार ७४१ जण बरे झाले आहेत.
10. तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका
गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेत रविवार-सोमवारी झालेल्या तौत्के चक्रीवादळाने जिल्ह्यात नुकसान झाले. घराच्या पडझडीत तीन लोक किरकोळ जखमी झाले तर खेड, मुळशी, भोर, माधळ आणि आंबेगाव तालुक्यात घरांची, काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले 190 ठिकाणी पडझड झाली.
No comments
Post a Comment