1४ मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - खंडणी प्रकरणी तोतया पोलीसाला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या !....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर अत्याचार
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाजनगर येथे एक युवक युवतिची फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन लैंगिक अत्याचार करणाºया रोहन खाजेकर या आरोपीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगर परिसरातील एक २५ वर्षीय तरुणी साडेचार वर्षापासून मुंबईतील भांडूप येथे लहान मुले सांभाळण्याचे काम करते. दोन वर्षापुर्वी मुंबईत असतांना पिडीत तरुणीची आरोपी रोहन खाजेकर याच्याशी फेसबुकरुन ओळख झाली होती.
२. कल्याण मध्ये सेना-भाजप युती करत फडकवला पंचायत समितीवर भगवा !
राज्य आणि देशपातळीवर एकीकडे सेना आणि भाजपामध्ये एकमेकांविरोधात कडक भूमिका घेत आहेत.मात्र कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत सेना-भाजप एकत्र आल्याचे दिसून आले आहे.भाजपच्या पाच सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मत देत चक्क सेनेच्याच अधिकृत उमेदवाराला पराभूत केले आहे.
विजयी झाल्यानंतर किरण ठोंबरे यांचे गावात फटाके वाजवून विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
3. खंडणी प्रकरणी तोतया पोलीसाला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
डोंबिवलीतील व्यापारी यांच्या विरोधात वाशी येथील पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दाखल केली . एका तोतयाने मी वाशी क्राईम ब्राँच मध्ये पोलीस असल्याचे सांगितले. जर कारवाई रोखायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार परब यांनी तुषारला तीन टप्प्यात पाच लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा 13 एप्रिल रोजी मोबाईलवर फोन करून आणखी 10 लाख रुपये पाहिजे म्हणून धमकी देऊ लागला.जर पैसे नाही दिले तर कारवाईची धमकी देऊ लागला.
4. आरोग्य मंत्री यांच्या अंबड तालुक्यात लस मिळत नसल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप
आरोग्य मंत्री यांच्या अंबड तालुक्यात लस मिळत नसल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आरोग्य सेतु वर लस बुकच होत नसल्याने नागरीक हवालदिल झालेत. 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण दोन दिवसांपासून बंद आहे.
5. कोरोना विरोधात लढणाऱ्या परिचारिकांना सलाम
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाजनगर येथे 12 मे हा परिचारिका दिवस साजरा करण्यात आला . मागील वर्षांपासून कोरोना या आजाराने जगात थैमान घातला आहे, आणि याच कोरोना विरोधातील लढाईमध्ये पोलीस, डॉक्टरांप्रमाणे आपली निस्वार्थीपणे भूमिका बजावत आहे त्या रुग्णालयातील परिचारिका. रात्रंदिवस आपली तहानभूक विसरून आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे तरी काही लोक त्यांचे नाव बदनाम करण्याचे प्रयत्न करतात तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून आपले सेवा देण्याचे काम चालू ठेवता
सध्या कोरोना संकटामध्ये या परिचारिकांचं योगदान विशेष आहे.
6. कॉल ऑफ ड्यूटी खेळ खेळणे पडले महागात
आपले मुले जर पब्जी किंवा फ्रिफायर, कॉल ऑफ ड्यूटी असे गेम खेळत असेल तर सावध असा...एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 13 वर्षीय मुलाला या गेमने चक्क दोन लाख विस हजार रुपयेला गंडवलय...आयडी व पुढील स्टेप खेळण्यासाठी पैशांची मागणी करुन मुलाने त्याच्या आईच्या फोन पे वरुन पैसे पाठविलेत.
7. जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला- दिपक डोके
शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद व हिंदू चे सन शासकीय नियमानुसार साजरे करण्यात यावेत या अनुषंगाने आशा सभागृह कदीम पोलिस स्टेशन येथे डी.उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह नगरसेवक व शांतता समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी बोलतांना सांगितले की, यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती शासकीय नियमानुसार साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे रमजान ईद व हिंदू चे सन देखील शासकीय नियमानुसार साजरे केले.
8. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंव्दारे आढावा बैठक
मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या, नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. मान्सून कालावधीतील संभाव्य धोका लक्षात घेता, संबधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्व तयारी आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात,व्हिडीओ कॉन्फरन्सिंव्दारे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
9. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे निषेध म्हणून काळे झेंडे फडकवण्यात आले
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाजनगर येथील सकल मराठा समाज बांधवांनी न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यस्त असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने काळे झेंडे दाखवून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.
10. दुकानांचे अर्धे शटर उघडे करून सर्व व्यवसाय जोरात,
राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन'अंतर्गत नियमावली जाहीर केली आहे.
या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.त्यानुसार प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरी देखील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील अनेक व्यावसायिक दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून ग्राहकी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिगचे तीन तेरा वाजले आहेत.गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील पानटपरी, मिठाई दुकान , कापड दुकान, गुटखा विक्री, बांधकाम साहित्य, जनरल स्टोअर्स, भांड्याची दुकाने, हॉटेल, ज्वेलरी, ढाबे, राजरोस पणे सुरू आहेत. या व्यावसायिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत.
No comments
Post a Comment