1३ मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. दया नायक “कम बॅक मुंबई
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळवलेले पोलिस अधिकारी दया नायक यांना मॅट कडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. दया नायक यांच्या गोंदीया येथील बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली असल्याचे म्हटले जात आहे. दया नायक यांची गोंदीया येथे बदली करण्यात आली होती. दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळत असून त्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आले होते.
2. वाळूज गावातील जलकुंभाच्या जागेचा प्रश्न तहसीलदार यांच्या मध्यस्थीने केल्यानेही सुटेना
औरंगाबाद वाळूज गावातील जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आज बुधवार गंगापूरच्या प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्यात तासभर चर्चा करुन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या चर्चेत तोडगा न निघाल्याने जलकुंभाच्या जागेसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तहसीलदार शिंदे यांनी ग्रामपंचायतीला दिले.
3. डोंबिवलीत जागतिक परिचारिका दिनी मनसेकडून परिचरिकांचा सन्मान !
गेल्या वर्षभरापासून कोविड च्या लढाईत फ्रंट लाईन वर्कर म्हणून परिचारिका काम करत आहेत.आज जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून मनसे जिल्हाध्यक्ष- नगरसेवक प्रकाश भोईर व नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या अमोघ सिद्धी हॉल डॉन बॉस्को स्कूल या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील सर्व परिचारिकांचे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला.
4. भारतीय जनता पार्टी युवा मोर्च शहर उपाध्यक्ष पवण झुगे याच्या वतिने रक्तदान शिबिर
आज देश कोरोना महामारीने त्रस्त झाला आहे. त्याला औपचारिक रूपाने लसिकरणचा उपक्रम, भारत सरकारने हाती घेतला आहे. परंतु लसिकरण झाल्या नंतर व्यक्तीला किमान 1 ते दीड महीना रक्तदान करता येत नाही. रक्ताचा मोठा तुटवड़ा निर्माण होईल ही बाब समजुन भाजपाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार सतोष दानवे यांच्या आदेशाने हनुमान घाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
5. औरंगाबाद येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त पीपीई किटचे वाटप
जागतिक परिचारिका दिनानिमित्त करमाड पोलीस ठाणे व टाटा टी कंपनीच्या वतीने १२ पीपीई किट करमाड ग्रामीण रुग्णालयायाला भेट म्हणून देण्यात आले. तसेच रुग्णालयातील परिचरिकांचा सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
6. शिवसेनेने पुढाकार घेऊन दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला पाहिजे-आमदार गणपत गायकवाड !
कल्याण : नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा विषय सध्या ठाणे रायगड जिल्ह्यात चांगलाच गाजू लागला आहे.
आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जागा या आरक्षित करून सरकारने त्या ताब्यात घेतला होत्या.आता या विमानतळाचे नाव हे लोकनेते . पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं अशी मागणी भूमिपुत्रांची आहे.
7. मुंबईत 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली आहे. मुंबई महानगरपालिकेचे 60 ते 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी ही माहिती दिलीय.
8. शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द
शिक्षण विभागाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यपामन नेमके कसे करावे? अकरावी प्रवेश नेमका कोणत्या निकषांवर द्यावा, याबाबत विचार विनिमय सुरु आहे. यामध्ये राज्यातील दहावीचा वर्ग असलेल्या विविध शाळांचे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून केले जात आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी सर्वेक्षणाअंती राज्यातील 17 हजार 743 शाळा तयार असून 3 हजार 683 शाळांनी आपली तयारी नसल्याचे सांगितले आहे.
9. वेळेआधीच लॉकडाऊन उठवल्याने परिस्थिती गंभीर : अमेरिकन तज्ञ डॉ. फौची
कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे वरीष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा जबरदस्त तडाखा भारताला बसला आहे.
10. रमजान ईद साजरी करण्याबाबत शासनाच्या गाईडलाईन्स जारी
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्धंध लागू केले आहेत. त्यानुसार जमावबंदी आणि संचारबंदी असून राजकीय, धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 13 किंवा 14 मे रोजी मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद साजरी केली जाणार आहे.
No comments
Post a Comment