Breaking News

1/breakingnews/recent

Special report - जागतिक कलादिन

No comments

 News24सह्याद्री - जागतिक कलादिन.......पहा सह्याद्री special रिपोर्ट





कारीगर हु साहब अल्फाजोकी मिट्टी से मेहाफेलो को  सजाता हु . कुछ को  बेकार तो कुछ कलाकार नजर आता हु

कलाकार . कोण असतो हा कलाकार ? आणि काय करतो हा कलाकार ? तर कलाकार म्हणजे कलेचे ज्ञान असणाऱ्या व कला प्रस्तुत करणाऱ्या व्यक्तीस कलाकार किंवा कलावंत म्हणतात. तुम्ही बघितले असतील काही कलाकार म्हणजे ,  उंबरठा चित्रपटातील स्मिता पाटील असेल किंवा नृत्याची जादू दाखवणारा प्रभुदेवा असेल.  गानकोकीळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लतादीदी असतील तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता पिस्तुल्या लघुपटाच दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे असेल. नाटकात अनेक पुरस्कार विजेते असणारे रंगकर्मी श्रीराम लागू असतील अगदीच आपल्या कुंचल्यातून अजरामर झालेल चित्र स्टेरी नाईट ने लाखोंचा चहाता झालेला Vincent van Gogh  असेल. परंतु भरपूर पैसा व प्रसिद्ध असलेले लोकच कलाकार असतात का ? तर अर्थात नाही .दैनंदिन जीवनात देवी आईचा  जागरण गोंधळ घालणारे  वाघ्या मुरळी हेही कलाकार च की. गावागावात हरिनाम सप्ताहामध्ये भारुड करणारे मंडळी हेही कलाकार . सकाळी सकाळी चिपळ्या वाजवत वासुदेव आला हो वासुदेव आला असं म्हणत पहाटेचा साथीदार म्हणजेच वासुदेव हा ही कलाकार .किंवा ऐका चा ठेका धरत गावागावातील तमाशातील फडात नाचणाऱ्या नृत्यांगणा व त्यांना आता ग बया म्हणत साथ देणारा  नाच्या  हेदेखील कलाकारच . हे सगळं मी आज च्या  दिवशी च का सांगतिये ? आणि कशासाठी ? कारण  आताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काही क्षण जगाला विशेष अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची खास गोष्ट .आज 15 एप्रिल जागतिक कला दिन दरवर्षी 15 एप्रिल रोजी कलात्मक निर्मिती आणि समाज यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी जागतिक कला दिन साजरा केला जातो. 

कलात्मक अभी व्यक्तींच्या विविधते बद्दल अधिक जागृती साठी प्रयत्न होतात आणि कौशल्य विकासासाठी सर्व क्षेत्रातील कलाकार यांचे योगदान यावरही प्रकाश टाकला जातो. परंतू मागील वर्षापासून काही कालावधीकरिता देश च नव्हे तर जग थांबले कारण होते कोरोणा मागील वर्षापासून तर अजतागत त्याचे पडसाद कायम आहेत. त्यातच अनेक छोटे मोठे कलाकार देशोधडीला लागले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. यातच भीम जयंती मुळे दरवर्षी विविध भजनी मंडळी व ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून उपजीविका भागवली जायची परंतु यंदा कोरोना मुळे या कलावंतावर उपासमारीची वेळ आलीये  ज्यांचे करार झाले होते त्यांनीही ते मोडून पैसे परत घेतले. लोककला क्षेत्रातही लाखो रुपयांची उलाढाल होते. यामधुन हजारो लोक कलावंताना वर्षभराचा रोगगार उपलब्ध होतो . मात्र यंदा करून आला आणि सर्व यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास देखील गेल्याची भावना लोककला क्षेत्रातील मंडळी मध्ये व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका नंतर अवकाळी पावसाचा फटका आणि आता कोरोनाने  सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रद्द झालेले सांस्कृतिक उत्सव यामुळे लोककलावंतांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे.

 त्यातच लोककलावंतांना सरकारकडून मिळणारे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे राज्यात जवळपास 35 हजार लोककलावंतांना राज्य सरकार तर्फे प्रत्येक महिन्याला मानधन दिले जाते . त्यामध्ये अ ब  आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे अनुक्रमे 3000 150 . 2500 आणि 1750 मासिक मानधन मिळते . जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही .मानधन मिळत असलेला  कलावंतांमध्ये पिंगळा भारुड तमाशा नाटक भीम गीत गायन व वादक अशा विविध प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे त्यातील अनेक जण वृद्ध आहेत अनेकांना दवाखाना तसेच औषधांचा खर्च करावा लागतो त्यामुळे कलाकारांचे मानधन लवकरात लवकर जमा करावे अशी मागणी होत आहे. याबाबतचे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना पाठविण्यात आले आहे. अर्थ विभागाकडून तातडीने लोक कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी करण्यात आली आहे .परिस्थिती कठीण मा न्य . परंतु कलाकार रक्त मासा इतकाच जिद्दीने बनलेला असतो. पडत अडखळत उठतो तेव्हा कलाकार म्हणून संबोधला जातो . या ही संकटाला कलाकार तितक्याच ताकतीने सामोरा गेला तो त्याची कला आज-काल सोशल मीडियातून मांडताना दिसतोय.कोरोना च्या काळातही ही त्याची सकारात्मक बाजू . मुळात जी थांबेल ती कला कसली आणि तिला थांबू देईल तो कलाकार कसला. कधीच मरत नाही ती कला असते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *