१५ एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे - पालकमंत्री बच्चू कडू........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. वृक्षारोपण प्रकरणात घोटाळा सिध्द
शिवसेना नगरसेविका संध्या नरेश महाजन यांनी चोपडा नगपरिषद सन २०१९-२० यांनी वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण कंत्राटातील केवळ १२ लक्ष च्या रोपांची मागणी असताना व ३२०० रोपे मोफत मिळाली. २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च कसा केला त्याबाबत माहिती मागीतली असता गैरव्यवहार निदर्शनास आला होता.
2. बळसाणे गावात डॉक्टर आपल्या दारी उपक्रमास प्रारंभ
गावात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून येथील ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्रतील डाँक्टर्स, आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यामाने सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली १४ एप्रिल रोजी बुधवारी डाँक्टर आपल्या दारी या अभियानाची संकल्पना उपसरपंच महावीर जैन यांनी तहसीलदार यांना सांगितली.
3. नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे..पालकमंत्री बच्चू कडू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने आज रात्रीपासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले आहे.
4. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर..
महाराष्ट्र राज्यात कोरोना झपाट्याने वाढत असुन सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.ही बाब लक्षात घेवुन काल उल्हासनगर काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहीत साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
5. काळ्या बाजारात जाणारा गहू गोंदी पोलीसांनी पकडलाय..
.पिकअप वाहनासह 34 गव्हाच्या गोण्या असा साडे पाच लाखाचा मुद्देमाल गोंदी पोलीसांनी पकडलाय..काल 14 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील चालक रोहन सुंदरराव परदेशी हा त्याची पिकअप मध्ये 34 गव्हाच्या गोण्या काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात होता.
6. कल्याणात ९७ वर्षांचे आजोबांनी केली कोरोनावर यशस्वी मात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच नकारात्मक वातावरण असताना कल्याणात 97 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.
7. सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान शिबिराचे आयोजन !
डोंबिवलीत रिपब्लिकन सेने तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती अगदी साधेपणाने कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.
8. *सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग*औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात
आई व लहान बहीण दवाखाण्यात गेल्यानंतर घरी एकटीच असलेल्या १६वर्षीय अल्पवयीन मुलीचा 24 वर्षीय आरोपीने घरी येऊन तिच्या मनास लज्जा वाटेल. असे वर्तन करून विनयभंग केला. ही घटना मंगळवारी रोजी दुपारी वडगाव को. परिसरात घडली.
9. रांगोळीतून जनजागृती करत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सध्या पणाने साजरी करण्यात येत आहे .या वर्षी प्रथमच परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकवर हेलिकप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो.
10. नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाई करा; उद्धव ठाकरे
गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
11. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय:अजित पवारांचा देवेंंद्र फडणवीसांना टोला
पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
No comments
Post a Comment