१ एप्रिल Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कोरोनाच्या धोक्याने ऑलिम्पिक पुन्हा संकटात........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. महिला शेतकरी मेघा देशमुख यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
राज्य शासनाच्या वतीने शेती क्षेत्रातील कामगिरीसाठी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून परभणी जिल्ह्यातील झरी येथील प्रगतिशील महिला शेतकरी मेघा विलासराव देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा 2019 चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
2. चोहोट्टा बाजार पोलिस चौकी समोर युवकांना मारण्याचा घाट
अकोल्यातील जुने शहर पोळा चौकात होळीच्या दिवशी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत्य काही समाज कंटकांनी केल आहे. चोहोट्टा बाजार पोलिस चौकी समोर युवकांना मारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
3. नांदेड शहरात पोलिसांवर भ्याड हल्ला
नांदेड शहरात पोलिसांवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा पोलिस बॉइज संघटना निषेध करीत आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी अकोल्यातील पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केली आहेय.
४. प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात पत्रकार परिषद
राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याकाठी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे नमुद केलेय. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी अजूनही खुलासा न केल्याने हा निर्णय गृहमंत्र्यांचा कि संपूर्ण कॅबिनेटचा होता असा संशय निर्माण होत आहेय.
५. दोंडाईमध्ये लग्नांवर दंडात्मक कारवाई करत पाच हजार रुपये दंड वसूल
कोविड विषाणूने शहरासह परिसरात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दोंडाईमध्ये लग्नसमारंभात पन्नास वऱ्हाडी मंडळींना प्रशासनाने परवानगी दिली.
६. कोरोनाच्या धोक्याने ऑलिम्पिक पुन्हा संकटात
करोनाचा धोका जपानमध्येही पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशातील लसीकरणाचा वेगही अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे होत असलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. सध्या तरी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही.
७. राहुल गांधी यांची बोचरी टीका
तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल तर आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते दिवसाचे 24 तास खोटं बोलतात, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आसाममध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी वाढती बेकारी, सीएए, कृषी कायदा आदी मुद्दय़ांवरून थेट मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे.
८. राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण
राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे.
९. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापले
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेणाऱया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हायकोर्टाने आज चांगलेच खडसावले.
१०. पंतप्रधानांकडून रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खास फोन करून 'सामना'च्या संपादक सौ.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.
No comments
Post a Comment