Breaking News

1/breakingnews/recent

तूर्तास लॉकडाऊनचा निर्णय नाही, आपली सर्व चर्चा त्याच दिशेन; राजेश टोपे

No comments




मुंबई -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु असल्याचं राजेश टोपेंनी सांगितले आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन  लागेलच, असा नाही.  पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी केले आहे.  राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी गुरुवारी  संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांनी सविस्तर उत्तरे दिली. 

राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात 50 टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल. राज्यातील लोक 15 दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *