Breaking News

1/breakingnews/recent

१५ एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - सर्वोच्च न्यायालयाची नवी कोरोना नियमावली.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा तर पार्सलमधून मद्य पाठवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना त्यांच्याच नातेवाईकांकडून खर्रा तसंच मद्य पाठवण्याचा प्रयत्न होत असल्याचं समोर आलं आहे. 

2. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; 24 तासांत 2 लाख नवे रुग्ण
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण भारतात आढळून येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांचा आकडा आता दोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 200,739 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

3. 'गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका'
नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

4. महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाळण्यास मनोरंजन विश्व तयार
 कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात 15 दिवस लॉकडाऊन लादण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

5. वाशीतील रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग?
 पुण्यातून वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका 28 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर अतिप्रसंग  झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. 

6. केंद्राने पाठवलेली चणाडाळ गोदामात पडून सडली
 केंद्र सरकारने राज्याला पाठवलेली सुमारे एक हजार टन चणाडाळ सरकारच्या गोदामात, दुकानात पडून सडल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या डाळीचे सर्वसामान्य जनतेला फेरवाटपाचे निर्देश वेळेत दिले गेले असते तर आज कित्येक परिवाराला त्याचा लाभ मिळाला असता. 

7. तिहार जेलचे 3468 कैदी गायब
कोरोनाच्या काळात देशभरातल्या अनेक तुरुंगातील कैद्यांची चांदी झाली होती. कोरोनामुळे तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. दिल्लीच्या तिहार जेलमधूनही 6,740 कैद्यांची अशा प्रकारे इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3,468 कैद्यांचा कोणताही माग लागत नाही. 

8. शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं आज एकदिवसीय 'कामबंद' आंदोलन
एकीकडे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. तर दुसरीकडे वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे. अशातच आता कोरोना संकटात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे. 

9. कोरोनाचे मृत्यू; मध्य प्रदेशात लपवालपवी?
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लक्षणीय आहेत. कोरोनाने मरण पावलेल्यांवर दहन आणि दफनविधी करण्यासाठी अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशातच राज्य सरकारकडून दिली जाणारी कोरोना मृतांची आकडेवारी आणि भोपाळमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या या रोगाने मरण पावलेल्यांच्या मृतदेहांची संख्या यात तफावत दिसून येत आहे.

10. सर्वोच्च न्यायालयाची नवी कोरोना नियमावली
कोरोनाच्या रुग्णवाढीची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कोरोनाची लक्षणे असणाऱया लोकांना न्यायालयात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *