गॉसिप कल्ला - शाहिद कपूर साकारणार 'कर्ण'
News24सह्याद्री - शाहिद कपूर साकारणार 'कर्ण'... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. 'सलमानवर कॉपीचा आरोप
सलमान खान भाई म्हणून फेमस असून तो खरेच भाई असल्याचे त्याचे चाहते म्हणत असतात. अनेक जणांचे करिअर त्याने चौपट केल्याचा आरोपही होत असतो. मात्र, तरीही तो दयाळू व्यक्ति असल्याचे सांगणारेही काही कमी नाहीत. असो...! आता विषय आहे तो...त्याचा "राधे'…ह्या चित्रपटाचा. हा चित्रपट लवकरच येणार असून याचे टीझर नुकतेच रिलीज झालेय.
2. दोस्ताना 2 च्या वादानंतर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच सोशल मीडियावर केली पोस्ट,..!
करण जोहरचा 'दोस्ताना 2' हा चित्रपट सध्या खूप चर्तेत आहे आणि त्या निगडित करण आणि कार्तिक याचा वाद देखील. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच कार्तिक ने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय .कार्तिकने पोस्ट केलेल्या फोटोत त्याचा वेगळाच लूक दिसत असून कार्तिकने कित्येक दिवसानंतर पोस्ट केल्यामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश असल्याचे देखील ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत
३. शाहिद कपूर साकारणार 'कर्ण'
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर 'महाभारत' या बहुचर्चित आगामी चित्रपटात 'कर्णाची' भूमिका साकारणार आहे. 'राकेश ओमप्रकाश' हे 'मायथोलॉजिकल-ड्रामा-महाभारत' या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. मात्र कर्णाची भूमिका साकारणे महाकठीण काम असून या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी शाहिदला संपूर्ण बॉडी ट्रान्सफ्रॉम करून कर्णाच्या लूकसाठी तयार केले जाणार आहे.
४. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष...; वाचा, दिग्दर्शक केदार शिंदे
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतोय. रूग्णालयातील बेड्स अपुरे पडत आहेत. अशात लोकांचे जीव धोक्यात आलेत.या पार्श्वभूमीवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.
५. कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले 'She-man'
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. आता तिची जीभ अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल बोलताना घसरली असून तापसी ही 'She-Man' असल्याचे तिने सांगितले आहे. सोशल मीडियात तिच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उडाल्यानंतर तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय.
No comments
Post a Comment