Breaking News

1/breakingnews/recent

सर्दी, खोकला आणि बंद नाक यावर सोपे घरगुती उपचार ,वाचा

No comments



News24सह्याद्री 

काही वेळा हवामानातील बदलामुळे नाकातून पाणी येणे, सर्दी, नाक बंद होणे असे आजार होतात. यावर तात्काळ करता येण्यासारखे काही सोपे घरगुती उपचार पाहूया. मात्र यासोबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. काही जण सर्दीमुळे नाक गळत असेल तर गरमागरम सूप आणि चहा पिणे पसंत करतात. आल्याचा चहा घेतल्यामुळे नाकातून पाणी येणे, नाक बंद होणे यापासून आराम मिळतो. श्वसनमार्गातील घाण बाहेर पडायलादेखील मदत होते. आल्याचा चहा घेतल्याने उत्साही वाटते. साधारण सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. लिंबू, दालचिनी आणि मध यांचे चाटण तयार करावे. हा एक गुणकारी आणि प्रभावी उपाय असून यामुळे लवकर बरे वाटते. वारंवार कोमट पाणी प्यायल्याने सर्दी, खोकल्याविरुद्ध लढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने घशाला आलेली सूज कमी होते. 

'हळद' स्वयंपाकघरात असतेच. हळद अँण्टिऑक्सिडंट आहे. झोपण्याआधी एक ग्लास दुधात हळद घालून प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या हाही साधासोपा घरगुती उपचार आहे. घशाला सोसेल इतक्या गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या केल्या की, घसा लवकर मोकळा व्हायला मदत होते. ताप, अंगदुखी, सर्दी, पडसे झाले असेल तर चहामध्ये तुळस, आले, काळीमिरी पूड, चहाची पात घालून केलेला चहा प्या. यामुळे सर्दी, खोकला बरा व्हायला मदत होते. आल्याचे लहान तुकडे करून त्यावर मीठ घालून खावेत. यामुळे सर्दी, खोकला आणि घशाचं दुखणं कमी होतं. गाजराचा रस प्यायल्याने सर्दी, खोकला बरा व्हायला मदत होते. हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *