कोरोना नंतरचा थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी करा घरगुती उपाय, वाचा
News24सह्याद्री -
कोरोनाची दुसरी लाट देशात हाहाकार उडवत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात विक्रमी 3 लाख 80 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तसेच 3 हजार 500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन वाऱ्याच्या वेगाने पसरत असून रुग्णालयांमध्ये आता जागाही शिल्लक नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. कोरोना हा व्हायरल आजार असल्याने अधिक वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून आली आहेत. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काही दिवस उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्याचे दिसले आहे. रुग्णाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत असल्याने याचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गरज आहे. हा व्हायरल आजार असल्याने शरीरातील पेशींची हानी होते आणि त्यामुळेच रुग्णाला थकवा जाणवतो. हा थकवा घालवून पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी काही घरगुती उपाय करुन पहा
फळांचा ज्यूस
कोरोनामुक्त झाल्यानंतर फळांचा ज्यूस (उदा. मोसंबी, संत्री, गाजर, आवळा ई.) , भाज्यांचे सूप (उदा. पालक, मेथी ई.) प्या. ज्यूस आणि सूप पचवण्यासाठी कमी उर्जा लागते. शरीराला आवश्यक पौष्टिक घटकही यातून मिळतात. यामुळे शरीराची झीज भरून येण्यास मदत होते. तसेच शरीर डिहायड्रेट होण्याचा धोकाही कमी होईल.
कडधान्यांचे सेवन करा
शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी मोड आलेले कडधान्य (उद्या. मूग, मठ, हरभरा) यांचे सेवन करावे. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने पोटासंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होत व पचनक्रिया सुरळीत होते. यात अँटी ऑक्सिडंट, जीवनसत्व ए, बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच यातील कॅल्शियममुळे हाडांमध्ये ताकद येते आणि लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबनची पातळी वाढून शरीर उर्जावान होते.
भाज्या आणि फळं
आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. पपई, टरबूज, संत्री, मोसंबी, डाळिंब, सफरचंद या फळांचे नक्की सेवन करा. तसेच आवडीनुसार अन्य फळं आणि भाज्यांचाही आहारात समावेश करा.
योग, प्राणायम करा
कोरोनामुक्त झाल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्याने शक्यतो जड व्यायाम करणे काही दिवस टाळा. त्याऐवजी प्राणायम, योग करा. अनुलोम-विलोम, भ्रामरी यासारखे प्राणायम केल्याने शरीर सुदृढ होण्यास मदतच होईल. तसेच योगासन, प्राणायाम आणि ध्यानसाधनेने शरीराची प्रतिकारशक्ती व फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, हे सिद्ध झाले आहे.
उपाशी राहू नका आणि पाण्याचे भरपूर सेवन करा
दिर्घकाळ उपाशी राहू नका. दोन-तीन तासांनी काही ना काही सेवन करा. तसेच जेवणानंतर लगेचच झोपू नका. दिवसभर भरपूर पाणी प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते यामुळे थकवा वाढतो.
हळदीचे दूध
झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होईल आणि थकवाही नष्ट होईल. तसेच दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.
No comments
Post a Comment