Breaking News

1/breakingnews/recent

१५ एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - श्रीगोंद्यातील धूळखात पडलेले व्हेंटिलेटर चालू करा-अक्षय अनभुले...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. नेवाश्यातील ११४ सरपंचांना संविधान भेट
काल  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी हि जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु  या वर्षी कोरोनाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक कार्यक्रम ,मिरवणूक इत्यादींवर बंदी आहे 

2. सलून दुकानदारांना सरकारने मदत करावी- स्नेहलता कोल्हे
सलून व्यवसायिकांना दुकानदारी शिवाय पर्याय नसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे वाढत्या कोरणा प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

3. कोविड सेंटरला राम शिंदे यांच्या पुढाकाराने  १६६ ऑक्सिजन सिलेंडर चे वाटप
जामखेड शहरातील कोविड सेंटरला समाजातून मदतीचा हात मिळत असताना भाजपचे माजी मंत्री राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी लोक सहभागातून 166 ऑक्सीजन सिलेंडर कोविड सेंटरला दिली आहेत.

4. उजनी यंदा गाठणार तळ
कर्जत व श्रीगोंदे या दोन तालुक्यातील सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असणाऱ्या उजनी धरणातील पाणीपातळी सध्या खालावते आहे उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढती मागणी तसेच हवामान विभागाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवल्या ने धरण यंदा तळ गाठणार असल्याची चिन्हे आहेत.

5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी-आशितोष काळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते ज्ञानाबद्दल प्रचंड आत्मीयता असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी मांडलेली तत्वेआदर्श असून त्यांनी केलेले कार्य हे विशिष्ट समाजापुरते मर्यादित नव्हते.

6. ग्रामीण रुग्णालय या पाठोपाठ अजून 50 ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार- लहू कानडे
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मुबलक उपलब्ध व्हावेत म्हणून ग्रामीण रुग्णालयात पाठोपाठ एक मोठे रुग्णालय अधिग्रहित करून पुन्हा 50 ते 60 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे 

7. श्रीगोंद्यातील धूळखात पडलेले व्हेंटिलेटर चालू करा-अक्षय अनभुले
श्रीगोंदा तालुक्यात कोरोना आजारासाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे गेल्या दोन दिवसात व्हेंटिलेटर सुविधां अभावी दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

8. आमदार विखे पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्धता करून देण्याची मागणी
नगर जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपलब्ध होत नसलेल्या आरोग्य सुविधांसह बीडचा गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्धता करून देण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

9. भाजी मंडईत ॲन्टीजिंग तपासणी दरम्यान आणि व्यावसायिक फरार
नेवासा तालुक्यातील सोनई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सोनई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाजी मंडईतील 41 व्यवसायिकांची रॅपिड तपासणी करण्यात आली सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

10. दुकानदारांना लसीकरण बंधनकारक
राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून लागू केलेली संचारबंदी जिल्ह्यातही लागू झाली आहे. मंगळवारी राज्य शासनाने जारी केलेला लॉकडाऊनचा आदेश जसाच्या तसा अंमलात आणण्यात येणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *