शहराची खबरबात - महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण सुरळीत
News24सह्याद्री - महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण सुरळीत... पहा शहराची खबरबात मध्ये
१. महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश
नगर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय .त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झालाय .लोकांना बेड्स ,ऑक्सिजन ,व्हेंटीलेटर्स साठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावे आणि त्यासाठी महापौर शहर विकास निधीत प्रस्तावित करण्यात आलेले २ कोटी वापरावेत अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना केलीये.
२. खासदार लोखंडे यांची भूमिका
शिर्डी लोकसभा मतदार संघात व आमच्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्नाची मोठी संख्या आहे ,देशातील पहिल्या दहा कोरोना बाधित जिल्ह्यामध्ये अहमदनगर चा समावेश आहे ,अनेक रुग्ण बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू पावलेले आहे .महाराष्ट मधील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे .काही तालुक्याच्या ठिकाणहून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी बरेच अंतर पार करावे लागते ,त्यात तालुका ते जिल्हा मध्यतंरी ऑकसीझन व व्हेंटीलेटर ची सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्ण रस्त्यातच गतप्राण होत आहेत.
३. सभापती अविनाश घुले यांचा इशारा
केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेचे काम मध्य शहरांमध्ये संथ गतीने सुरू असल्यामुळे मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.यासाठी भुयारी गटार योजनेचे काम जलद गतीने मार्गी लावावे ....गेल्या अनेक दिवसांपासून मध्य शहरांमधील रस्त्याची दुरावस्था झालीये . त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
४. नगर शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आश्वसन - डॉ. सुजय विखे
नगर शहरात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे तसेच रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नगर चे खासदार न्यूरोसर्जन डॉ.सुजय विखे पाटील हे पुन्हा मदतीसाठी पुढे सरसावले आहेत...,कोरोना रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ची गरज भासत असल्याने नगर शहरात १० दिवसांच्या आत ऑक्सिजनाचे प्लांट उभारण्याचे तसेच गरज असल्यास इतर हॉस्पिटल्स ला देखील ऑक्सिजन पुरवण्याचे आश्वासन सुजय विखे यांनी दिलय...तसेच नगर मधील उद्योगपतींनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे .
५. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण सुरळीत
महानगरपालिकेच्या माध्यमातून संसर्ग विषाणूला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक लसीकरणाचे काम आरोग्य केंद्रामध्ये सुरू आहे ...लस घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाला अडथळा निर्माण होत आहे. आज तोफखाना येथे नागरिकांची लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली असल्यामुळे नागरीकांमध्ये गोंधळ उडाला होता.
No comments
Post a Comment