गॉसिप कल्ला - कंगनाने मोदींना दिला पाठिंबा
News24सह्याद्री - कंगनाने मोदींना दिला पाठिंबा... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. ‘तान्हाजी’ मराठीत
अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे.
२. कंगनाने मोदींना दिला पाठिंबा
सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणावत ने नरेंद्र मोदी यांना तिचा पाठिंबा असल्याच दाखवण्यासाठी एक ट्विट केले आहे.कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटवर तिची प्रतिक्रिया देत हे ट्विट केले आहे.
३. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज
‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेची लोकप्रियता पाहून या मालिकेचे मेकर्स प्रेक्षकांसाठी याचे अॅनिमेटेड व्हर्जन घेऊन आले आहेत. ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ असं या शोचं नाव आहे. हा शो खास लहान मुलांसाठी डिझाइन केलेला आहे.
४. ‘गंगूबाई काठियावाडी’साठी संजय लीला भन्साळींचा मोठा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. संजय लीला भन्साळी.यांनासुद्धा आपल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आता मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कोरोनामुळे संजय लीला भन्साळी मोठा निर्णय घेत ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा आहे.
५. अमृता खानविलकरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य,अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे.अमृताने अलिकडेच इंस्टाग्रामवर तिचं ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिच हे फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. फोटोतील अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.
No comments
Post a Comment