'रंग माझा वेगळा' मालिकेतील श्वेता आहे या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी
News24सह्याद्री -
मराठी स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात पोहचली आहे. या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे. आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे. अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहे. त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले आहे. 'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.
अनघाने नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. भगरे गुरूजी सध्या झी मराठीवर 'वेध भविष्याचा' आणि नुकत्याच सुरू झालेल्या पौराणिक मालिकेत पहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवर "घेतला वसा टाकू नको" ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात आहे. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. भगरे गुरूजी आपल्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.
No comments
Post a Comment