Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असलेल्या बाबी

No comments

       News24सह्याद्री -




अहमदनगर जिल्ह्यातील दैनंदिनी वाढती रुग्ण संख्या उपलब्ध बेडची संख्या ऑक्सिजनचा आणि औषधाचा पुरवठा याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रमाणात ताण पडत आहे जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नव्याने अध्यादेश लागू केला आहे पाहुयात  या अध्यादेशानुसार एक मे पर्यंत जिल्ह्यातील काय सुरु आणि काय बंद राहणार आहे .

सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील

हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू
धार्मिक स्थळे पुर्णतः बंद
आठवडे बाजार पूर्णतः बंद

भाजीपाला / फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता
दारु दुकाने पूर्णतः बंद
टैक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू
चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू
दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी

सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद
कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद
शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद
स्टेडिअम, मैदाने पूर्णतः बंद

विवाह समारंभास बंदी
चहाची टपरी /दुकाने पूर्णतः बंद
अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद
सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद

सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद
सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद
व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग इव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद
बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असलेल्या बाबी
किराणा दुकाने
 दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
भाजीपाला विक्री
अंडी मटण चिकन मत्स्य
 कृषी संबंधित सर्व सेवा/दुकाने
पशुखाद्य विक्री
पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल डिझेल सीएनजी गॅस विक्री
अत्यावश्यक सेवा मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *