शहराची खबरबात - एमआयडीसीतील कामकाज बंद ठेवण्याची मागणी
News24सह्याद्री - एमआयडीसीतील कामकाज बंद ठेवण्याची मागणी... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. मनपाच्या भरारी पथकाकडून 100 हून अधिक विक्रेत्यांवर कारवाई
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून याचाच भाग म्हणून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आलेत... तसे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत .. मात्र या नियमांना डावलून भाजीविक्रेते आपला व्यवसाय करत आहेत अशा व्यावसायिकांवर मनपाच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केलीये यात महात्मा फुले चौक, बालिकाश्रम रोड, भूतकरवाडी चौक रोड इत्यादी भागांचा समावेश आहे.
२. एमआयडीसीतील कामकाज बंद ठेवण्याची मागणी
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच सरकारने एमायडिसी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय ... पण एमआयडीसीतील अनेक कामगार कोरोणा बाधित झालेले असल्याने सरकारने एमआयडिसी काही काळ बंद ठेवावी अशी मागणी कामगार वर्गातून होऊ लागलीये.
३.पोलीस ऍक्शन मोडमध्ये
नगर जिल्ह्यासह शहरात वाढता करुणा चा प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर विनाकारण फीरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर नगर मधील पत्रकार चौक,प्रोफेसर चौक ,डी एस पी चौक ,तसेच दिल्लीगेट आशा विविध भागांमध्ये नाकाबंदी करून पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे.
४. वीज ग्राहकांना स्वतःहून मिटर रिडींग पाठवण्याची सोय
सध्या कोरणा विषाणू ची दुसरी लाट सुरू असल्याने संचार बंदी आहे तसेच काही भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.... त्यामुळे अशा ठिकाणी महावितरनाला मीटर रीडींग घेण्यास शक्य न झाल्यास आता वीज ग्राहकांना स्वतः मीटर रीडींग पाठविता येणार आहे.
५. डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
रेमेडीसीव्हीवर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेल्या व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूमध्ये सोयीसुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आलीये.
No comments
Post a Comment