Breaking News

1/breakingnews/recent

भारतातील आतापर्यंतचे बायोबबल वातावरण सर्वाधिक असुरक्षित - झॅम्पाचे मोठे विधान

No comments



मुंबई -

झॅम्पाने भारताविषयी केले मोठे विधान आयपीएल सोडून मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाने भारतातील बायोबबल वातावरणाबाबत मोठे विधान केले आहे. भारतातील बायोबलचे वातावरण आता पर्यंतचे असुरक्षित आहे, त्यामुळे मी आयपीएल २०२१  मधून माघार घेतली, असे झॅम्पाने म्हटले आहे. मागील वर्षीप्रमाणेच या वेळचे आयपीएल युएईमध्येही व्हायला हवं होतं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघातील झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारण देत मायदेशी परतले आहे. 

अ‍ॅडम झॅम्पाने सिडनी मॉर्निंग हेराल्डला मुलाखत दिली. गेल्या वर्षी आयीपएल यूएईमध्ये खेळवण्यात आलं होतं. तिथे आम्हाला सुरक्षित वाटत होते. आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायोबबल वातावरणात खेळलो आणि मला वाटते की भारतातील बायोबबलचं वातावरण हे सुरक्षित नाही आहे. आम्हाला भारतात नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितले जात होते आणि अधिकची दक्षता घ्यावी लागत होती.  'सहा महिन्यांपूर्वी आयपीएल दुबईमध्ये झाली होती, त्यामुळे तेथे आम्हाला अजिबात तसं वाटत नव्हतं. मला तिथे खूप सुरक्षित वाटलं. वैयक्तिकरित्या मला वाटतंय की आयपीएलसाठी यूएई हा एक चांगला पर्याय ठरला असता, परंतु त्यात बरीच राजकारणाची जोड आहे. यावर्षी टी-२० वर्ल्ड कप आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल, असे झॅम्पा म्हणाला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *