शहराची खबरबात - राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास संशयास्पद
News24सह्याद्री - राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास संशयास्पद... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. दुकानदारांना लसीकरण बंधनकारक
राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून लागू केलेली संचारबंदी जिल्ह्यातही लागू झाली आहे. मंगळवारी राज्य शासनाने जारी केलेला लॉकडाऊनचा आदेश जसाच्या तसा अंमलात आणण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत उघडे राहणार असून या सेवेतील दुकानदारांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
२. राज्य सरकारने बिडी कामगारांनाही पंधराशे रुपये मदत द्यावी
राज्यात एक मेपर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसांच्या लोक डाऊन काळात बिडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा कामगारांचा रोजगार सुरू ठेवण्यासाठी विडी कारखान्यांच्या घरखेप सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन लालबावटा बिडी कामगार युनियन आयटक आणि बिडी कामगार युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
३. रेमडेसिवीर लोकेशन साठी कंट्रोल रूम ची स्थापना
जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे ती कंट्रोल रूम 24 तास कार्यरत राहणार आहे या कंट्रोल रूमचा दूरध्वनी क्रमांक 0 241 23 22 432 आहे.
४. राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास संशयास्पद..!
राहुरी तालुक्या मध्ये काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून आत्तापर्यंत त्या खुनाचा तपास लागला नाही आरोपी हे मोकाट फिरत आहे. पत्रकार रोहिदास दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्टेशनला संरक्षणाची मागणी केली होती परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही.
5. मानवतेच्या भावनेतून कर्तव्य पार पाडणार महापौर वाकळे
कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्याही वाढत आहे नगर शहर हे मुख्यालयाचे ठिकाण असल्यामुळे जिल्हा बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशील कोरणा रुग्ण यासाठी नगर शहरात येत असतात दुर्दैवाने काहींचा मृत्यू होत आहे.
No comments
Post a Comment