Breaking News

1/breakingnews/recent

कोणता संघ जिंकणार सलग दुसरा सामना? आज चेन्नई-राजस्थानमध्ये टक्कर होणार

No comments



मुंबई -

IPL सध्या चांगलीच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमाची सारखीच सुरुवात केली आहे. या दोन्ही संघांना आपल्या सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी दमदार पुनरागमन करत पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नईने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स संघावर, तर राजस्थानने दिल्ली कॅपिटल्स संघावर मात केली होती. त्यामुळे आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांचे सलग दुसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य असेल.

सॅम करन सलामीला?

चेन्नईने पंजाब किंग्सवर मात करत आपला यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला होता. या सामन्यात दीपक चहरने अप्रतिम गोलंदाजी करत ४ विकेट घेत पंजाबला अडचणीत टाकले. त्याला इतर गोलंदाजांचीही चांगली साथ लाभली होती. फलंदाजीत मोईन अलीने आपला चांगला फॉर्म कायम राखला. मात्र, सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ १० धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागी सॅम करनला सलामीला पाठवण्याचा चेन्नईचा संघ विचार करू शकेल. तसेच लुंगी इंगिडीलाही संधी मिळू शकेल.

वोहराच्या जागी यशस्वी?

दुसरीकडे राजस्थानला सलामीची चिंता आहे. मनन वोहरा दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला आहे. दिल्लीविरुद्ध जॉस बटलरने वोहराच्या साथीने सलामी केली. मात्र, त्यांना केवळ १३ धावाच जोडता आल्या. त्यामुळे वोहराच्या जागी मुंबईकर डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकेल. दिल्लीविरुद्ध डेविड मिलर आणि क्रिस मॉरिस यांनी मॅचविनिंग खेळी केली. त्यामुळे त्यांचाही चांगली कामगिरी सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *