Breaking News

1/breakingnews/recent

शरीरात 'व्हिटॅमिन ए' ची कमतरता मग 'हे' घटक आहारात घ्या

No comments



News24सह्याद्री -

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे. त्यामध्येही व्हिटॅमिन ए आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असले पाहिजे. उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच आंब्यात सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. 

प्रत्येक फळामध्ये काही खास गुणधर्म असतात, ज्याचे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी फायदे असतात. यापैकी एक फळ म्हणजे पपई. पपई खूप सहज उपलब्ध होणारे फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. पपईचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज निश्चित प्रमाणात खाऊ शकतो. उन्हाळ्यात, याच्या सेवनामुळे दिवसभर शरीरात उर्जा राहते.जर आपण वजन कमी करण्यासाठी प्लान करीत असाल तर आपण पपईचे सेवन करणे आवश्यक आहे. पपईमध्ये असलेले फायबर्स तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.

पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हा व्हिटॅमिन ए सीचा मोठा स्त्रोत आहे. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.

फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते.दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *