जिल्ह्याची खबरबात - तहसीलदारांच्या आवाहनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा प्रतिसाद
News24सह्याद्री - तहसीलदारांच्या आवाहनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा प्रतिसाद....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. घरोघरी जाऊन होणार करोनाबाधितांची तपासणी
राहुरी तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे.
2. एच आर सी टी स्कॅन मशिन खरेदी करावे
कोपरगाव नगरपालिकेने न पा फंडातून एच आर सी टी स्कॅन मशिन खरेदी करावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे नगरसेवक योगेश बागुल जनार्दन कदम शिवाजी खांडेकर आरिफ कुरेशी आदी उपस्थित होते.
3. तहसीलदारांच्या आवाहनाला
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा प्रतिसाद
तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात पाच दिवसांसाठी वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील तहसीलदार देवरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या ऑफिस च्या गेटला कुलूप लावले आहे
4. अणखेरीदेवीची यात्रा रद्द
जामखेड तालुक्यात सर्वात मोठी सालाबादप्रमाणे भरणारी अणखेरीदेवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. फक्राबाद,धानोरा, वंजारवाडी या तीन गावच्या हाद्दीत या देवीचे मंदिर आहे.कोरोना ससंर्ग आजार वाढु नये या कारणास्तव या तीनही गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला या देवीचे ट्रस्ट कमिटीचे सदस्य व पुजारी चंद्रकांत क्षीरसागर व मान्यवर उपस्थित होते.
5. दिव्यांग संस्थेच्या मागणीला यश
श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेवगाव येथे दिव्यांगासाठी स्वतंत्र कोविड सेन्टर सुरू करण्यात आले.आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्यातील पहिला आदर्श उपक्रम लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप
पाथर्डी शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाण मार्फत कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी,व जनजागृती आणि रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोज ढाकणे, सतीश डोळे, रवींद्र खंडागळे, मन्सूर शेख, अभिजित बोरले, अभिजित खेडकर, दादासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
7. कोव्हिड केअर सेंटरला दोन टन धान्याची मदत
कर्जत येथील कोव्हिड केअर सेंटरला राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहितदादा पवार युवा मंचच्या वतीने सुमारे दोन टन धान्याची नुकतीच मदत करण्यात आली. कर्जत प्रशासनाच्या उपस्थितीत हे धान्य सुपूर्द करण्यात आले. यामध्ये सर्वप्रकारच्या डाळी,तेल आदींच्या सामावेश आहे. आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी व रोहितदादा पवार युवा मंचच्या हस्ते हे धान्य प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
8. रुग्णांच्या नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’आणायला सांगू नका : आ. कानडे
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रेमडेसिविरचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासन रेमडेसिविरचे वाटप केवळ रुग्णालयांना करत आहे. कुठल्याही दुकानात ते मिळत नाही. असे असताना डाॅक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर उपलब्ध करण्याबाबत सांगणे अयोग्य आहे,
9. निळवंडे धरणातून शेती व पिण्यासाठी सोडले आवर्तन
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी उन्हाळ्यातील दुसरे मोठे आवर्तन निळवंड्यातून बुधवारी सोडण्यात आले. सकाळी १० वाजता १४५० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील गावांत आनंद व्यक्त केला.
10. नागरी वस्ती शेजारी कोविड सेंटर सुरु करू नये
पारनेर मध्ये सध्या अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु होत आहेत या विरुद्ध आता नागरिकांनी तक्रार करण्यास सुरवात केली असून नागरी वस्ती शेजारी अथवा मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरु करू नयेत अश्या आशयाचे निवेदन पारनेर तहसीलदारांना देण्यात आले आहे.
No comments
Post a Comment