शहराची खबरबात - बोल्हेगाव मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
कोरोना चा संसर्ग वाढत असतानाच येथील अमरधाम येथे नातेवाईकांनी गर्दी करत स्वतःच अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांना बाहेर काढले. त्यानंतर दोन जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. महापालिकेच्यावतीने अमरधाम येथे कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.
2. ऑक्सीजन यंत्रणा पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या!
रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी यंत्रणा बसवल्या आहेत. ऑक्सीजन सिलेंडर द्वारे रुग्णांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. या यंत्रणेमध्ये तांत्रिक दोष बिघाड होऊन ऑक्सिजन गळती होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिक मध्ये ऑक्सिजन गळती होऊन अनेक रुग्ण दगावले.
3. दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद
तुम्ही काउंटर मधील पैसे द्या. आम्ही येथील डॉन आहोत. तुम्ही आम्हाला कपडे फुकट द्यायचे. आणि तुम्ही आम्हाला हप्ता द्यायचा. असं म्हणून गुंडगिरी करणाऱ्या दरोड्यांच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.
4. बोल्हेगाव मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर
कोरोणा रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे बोल्हेगाव परिसरात महापालिकेने कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. गांधीनगर रोडवर भराडी सोसायटीमध्ये पश्चिमेस शिंदे यांचे घर, तर उत्तरेस ओपन स्पेस समोरील कॉलनी, ओपन स्पेस समोरील घरे, तर दक्षणेस जाधव यांच घर ते गायकवाड यांचे घर. या भागात येत्या पाच मेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. या परिसरात वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सेवा आस्थापने दुकाने बंद करण्यात आली आहे. या भागातील वाहतुकीलाही निर्बंध घालण्यात आले आहे.
5. रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले
नगर शहरासह जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ॲक्टीव रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण गृहविलगिकरनात आहेत. तर काही रूग्णांची प्रकृती गंभीर होईपर्यंत चाचणी न करता घरीच उपचार घेत आहे. अनेक रुग्ण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. तर काही घरीच उपचार घेतात. मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर असे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचार प्रतिसाद देत नाही.
No comments
Post a Comment