गॉसिप कल्ला - अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा फोटो
News24सह्याद्री - अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा फोटो... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. सायली संजीवमध्ये अभिनयासह पेंटींगची कला
कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात.वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं.असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिलाही आहे. सायली ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक वारली पेंटिंग काढत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
२. अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा फोटो
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. नुकतेच अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा ट्रेडिशनल लूकमधला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
३. शुटींग सोडून प्रभास पोहोचला चाहत्याच्या भेटीला!
अभिनेता प्रभास फिल्मी जगतातला असा कलाकार आहे, जो केवळ आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो, इतकेच नाही तर जेव्हा जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज पडते, तेव्हा तो त्यांना मदत देखील करतो.नुकतीच प्रभासच्या या स्वभावाची प्रचीती पाहायला मिळाली.
४. अभिनेता सुबोध भावेचा चाहत्यांना कानमंत्र
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल तो नेहमी अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोतून त्याने आपल्या चाहत्यांना कानमंत्र सुद्धा दिला आहे. सुबोध भावे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
५. मेकअपशिवाय सोनाली कुलकर्णी दिसते तितकीच सुंदर
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी सोनालीने तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.
No comments
Post a Comment