Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कोरोनामुळे यंदा बदल्यांबाबत साशंकता

No comments

  News24सह्याद्री - कोरोनामुळे यंदा बदल्यांबाबत साशंकता..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. कोरोनामुळे यंदा बदल्यांबाबत साशंकता
कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा होणार की नाही याबाबत साशंकता असून कर्मचारी संघटनांनी या  बदल्या करू नये अशी मागणी केली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत आणि तालुका अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात होते यंदा कोरॉना संसर्गाचा काहर असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार की नाही.

2. बूथ हॉस्पिटलला महिन्याभराचा ऑक्सिजन
ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचे प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर च्या वतीने नगर मधील बूथ हॉस्पिटल ला ऑक्सिजनचे पाच जंबो सिलिंडर देण्यात आले तसेच पुढील एक महिन्यासाठी ऑक्सिजनच्या खर्चाची जबाबदारी रोटरी इंटिग्रिटीने उचलली आहे

3. कोरोना लसीचा शहरात तुटवडा
शहरात महापालिकेच्या आठ केंद्राद्वारे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे महापालिकेला अठराशे कोवीशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत आठ केंद्रांचा विचार करता प्रत्येक केंद्रावर तीन ते चार दिवसांसाठी किमान दोनशे लसी उपलब्ध झाले असतील अशा स्थितीत लस उपलब्ध होत नसल्यामुळे महापालिका प्रशासन मे महिन्यात कोरोणा लसीकरण केंद्रे वाढविणार नाही.

4. कोविड उपचारासाठी बारस्कर यांच्या निधीतून १० लाख
वर्षभरापासून कोरोना संसर्ग विषाणुंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे. त्यामुळे विकास कामापेक्षा सध्या नागरिकांच्या आरोग्‍याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

5. अमरधाममधील कोविड मयतांचे अंत्यविधी थांबवा
नालेगाव अमरधाम हे मध्यवर्ती शहराच्या लगत असल्या मुळे येथे होत असलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यविधी मुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात दररोज मोठी वाढ झाल्यामुळे नालेगाव अमरधाम येथे मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होत असल्यामुळे नालेगाव गावठाण, सुडकेमळा, बागरोजा हडको, दिल्लीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रोड परिसर, ठाणगे मळा या परिसरासह दाट लोकवस्ती आहे. या कोरोना रुग्णांची अंत्यविधी मुळे मोठ्याप्रमाणात धुराचे साम्राज्य याठिकाणी निर्माण होते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *