१ एप्रिल सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - परभणी जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये वाढ, 5 एप्रिल पर्यंतचे जिल्हाधिकार्यांचे आदेश...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. उपनगराध्यक्ष नबु पिंजारी यांची कोविड सेंटरला भेट
दोंडाईचा शहरासह परिसरात कोविड विषाणूने चांगलेच डोकेवर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. ही परस्थिती लक्षात घेता उपनगराध्यक्ष नबु पिंजारी यांनी नव्याने सूरू झालेले कामगार कल्याण भवनातील कोविड सेंटरला भेट देत, बाधित रुग्णांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
2. परभणी जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये वाढ संचारबंदी 5 एप्रिल पर्यंतचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
परभणीमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीच्या कालावधीमध्ये वाढ केली.
3. नळामधून घाणेरडे आणि खराब पाण्याने नागरिक संतप्त
लोणार मध्ये पालिकेच्या काही भागात नळाद्वारे सोडण्यात येणारे पाणी घाणेरडे येत असुन ते पाणी पिण्याचे तर सोडा वापरण्या योग्य सुद्धा नाही त्याच पान्याने हातधुवून कोरोनापासून संरक्षण कसे होईल? येथील नागरिक नगरपालिकेची नळपट्टी भरून सुद्धा नळाद्वारे आलेले पाणी पिण्यासाठी उपयोग करीत नसून पिण्यासाठी खाजगी टॅंकरचे विकत पाणी घेत असल्याचे चित्र लोणार मध्ये दिसत आहे.
4. महिन्याला शंभर कोटी वसुली हा गृहमंत्र्यांचा की कॅबिनेटचा निर्णय
राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याकाठी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे नमुद केलेय.
5. औरंगाबाद वाळूज परिसरात भीषण आग
औरंगाबाद वाळूज परीसरातील आसलेल्या गोलवाडी शिवारात औरंगाबाद-नगर महामार्गावर काल अचानक आग लागली होती. या आगीच्या घटनेत छावणी लष्कर हद्दीतील जमीनीवरील शेकडो झाडे आगीच्या चपाट्यात सापडून भस्मसात झाली.
6. आमदार डॉ.बालाजी कीणीकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन
कोरोना साथ रोगाच्या नियमाचे पालन करत काल अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.बालाजी कीणीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक,अंबरनाथ पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली.
7. डोंबिवलीत राजाजी पथ २४ तासासाठी बंद
डोंबिवली पूर्व पश्चिम ला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या दुसऱ्या टप्यातील गर्डर चे काम शुक्रवारी करण्यात येणार असल्याने १ एप्रिल रात्री बारा वाजल्यापासून २ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यत असे एकूण २४ तास कोपर पुलावरील गर्डर टाकण्याचे काम होणार असल्याने राजाजी पथ शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
8. डोंबिवलीत मनविसे ने घेतली महावितरण ची भेट
डोंबिवली सुनीलनगर या परिसरात विधुत दिवे हे गेल्या काही दिवसापासून बंद होते व सुंदरा कॉम्प्लेक्स तुकाराम नगर येथे तांत्रिक बिगडा मुळे ट्रान्सफर्माला आगलागली होती.
9. कच्चामाल पाठवणाऱ्या वर सायबर सेल मध्ये गुन्हा दाखल
औरंगाबाद वाळूज एम आय डी सी परीसरात कच्चामाल पाठवणाऱ्या कंपनीच्याच मेल सारखा बनावट ईमेल आयडी तयार करून कच्चा मालासाठी आगाऊ रक्कम देताच माल पाठवण्यात येईल.
10. अकोल्यात तापमानाचा पारा चाळीशी पार
अकोल्यात तापमानाचा पारा चाळीशी पार पोहोचल्याने उन्हाच्याखरं वाढत चाललंय.अशा उकाड्यात गारव्याची अनुभूती देणारे माठ, टरबूज, खरबूज, नारळपाणी व रसवंतीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहे.
No comments
Post a Comment