जिल्ह्याची खबरबात - रेमडेसिवीरचा काळाबाजार; २ जणांविरुद्ध गुन्हा
News24सह्याद्री - रेमडेसिवीरचा काळाबाजार; २ जणांविरुद्ध गुन्हा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत.
राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात डॉ. रवी आरोळे यांच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये कोरना बाधित रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत.
2. विजेच्या कडकडाटासह ह गारांचा पाऊस
मागील चार-पाच दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे यात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विजेच्या कडकडाटासह ह गारांचा पाऊस कोसळला तर घारगाव बेलवंडी भागात हलकासा पाऊस पडला मागील चार दिवसात तीन वेळेस परिसरात पाऊस झाल्याने या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
3. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यामुळे उत्पादकांचे नुकसान
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ऊस तोडी बाबतच्या चुकीच्या धोरणामुळे उसाची तोड वेळेत न झाल्याने ऊस उत्पादकांचे नुकसान झाले आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी केले.
4. कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक
कुकडी पाणी प्रश्नासाठी श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील कुकडी कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य दीकर पंढरकर प्रमोद जगताप सुरेश भापकर सामाजिक कार्यकर्ते मारोती भापकर यांनी धरणे आंदोलन केले होते.
5. रेमडेसिवीरचा काळाबाजार; २ जणांविरुद्ध गुन्हा
वाढत्या काेरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शन औषधाचा काळा बाजार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली.
6. कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी बाधित
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कोरोना योद्धे म्हणूनच काम करत आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत. काहीजण विलगीकरण कक्षात आहेत.
7. शेवगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटा अवकाळी पाऊस
जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदारी हजेरी लावली आहे. हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, व विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळं हा पाऊस पडेल, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं होतं.
8. आढावा बैठकीत खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न
नेवासा येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने बैठकीत गोंधळ उडाला नेवासा मध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला तालुक्यात करुणा संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याच्या कारणावरून हा शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे
9. साडेनऊ हजार रिक्षाचालकांना मिळणार दीड हजारांची मदत
कोरणा विषाणू ची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने एक मेपर्यंत आणखीन क** निर्बंध जारी केले असून या काळात आर्थिक दुर्बल घटकांसाठी मदत जाहीर केले आहे.
10. चार बिबट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे गेल्या आठ दिवसांपासून चार बिबट्यांनी तीन शेळ्या व तीन कुत्रे फस्त करीत धुमाकूळ घातला आहे बिबट्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
No comments
Post a Comment