राज्यात लॉककडाऊन लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वपूर्ण माहिती.
मुंबई -
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. अशा वेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. तर निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(20 एप्रिल) केलेल्या भाषणाचा संदर्भ देत आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती पाहता कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 'ब्रेक द चेन' मोहिमेतर्गत ही साखळी तोडणार आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळाने भूमिका मांडली की, आपल्याला लॉकडाऊन करून ही साखळी तोडावी लागेल. त्या अनुषंगाने आता लॉकडाऊन हा जरी शब्द नसला तरी ब्रेक द चेन नुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात जिल्हा बंदी असणार?
संपूर्ण जिल्हा बंदी करण्यात येणार नाही. तर कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. खूपच अत्यावश्यक असेल तरच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे जिल्ह्याच्या सीमेवर नागरिकांना जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्या मागतो कारण विचारलं जाणार असं आवश्यक असेल तर परवानगी देण्यात येईल असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
No comments
Post a Comment