शहराची खबरबात - मनपा करवसुलीत मोठा गैरव्यवहार
News24सह्याद्री - मनपा करवसुलीत मोठा गैरव्यवहार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. नळकांडेंचे जागरण गोंधळ आणि शिंदेंचे आत्मदहन
वारंवार आंदोलने मोर्चे आणि निवेदने देऊनही कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्न सुटायला तयार नाही त्यामुळे पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी जागरण गोंधळ व बोंबाबोंब आंदोलन तसेच नगरसेवक सचिन शिंदे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
2. दोन महिन्यात दोन लाख नागरिकांची लसीकरण
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे मनपाकडून उपाययोजनांना वेग आला असून येत्या काही दिवसात मनपाकडून सुमारे एक हजार रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था करून कोबीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
3. पक्षपाती कारवाई थांबवा
अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशाशन वेगवेगळ्या पातळी वर प्रयत्न करत आहे तर काही ठिकाणी पोलीस आणि महसूल प्रशासन महानगरपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे हि कारवाई करतांना अनेक ठिकाणी दुजाभाव होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे काही राजकीय पक्ष विविध कार्यक्रम घेऊन गर्दी करत प्रशासनाचे कोणतेही नियम पळतानाच चित्र दिसत नाही तरीही या ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही मात्र सर्व सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
4. मनपा करवसुलीत मोठा गैरव्यवहार
शहरातील मोबाईल टॉवर करवसुलीत मनपाची फसवणूक होत आहे तसेच अनेक वेळा सांगूनही नवीन घरांना कराची आकारणी होत नाही मनपाचे कर्मचारी अशा इमारती मध्ये जाऊन चक्क हप्ते गोळा करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक कुमार वाकळे यांनी केला आहे.
5. जिल्हा परिषदेत अभ्यागतांना ‘नो एंट्री’
Covid-19 चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेत अभ्यागतांना पुन्हा नो एन्ट्री करण्यात आली आहे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त अधिकारी कर्मचारी सोडून कुणालाही जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेश देण्यात येत नाही जास्तीत जास्त कामे टपालाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
No comments
Post a Comment