मोठी बातमी - १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही
News24सह्याद्री -
केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्यातल्या तरूण वर्गाने लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
No comments
Post a Comment