१ एप्रिल मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - शिवभोजन थाळी पुन्हा पाच रुपयात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कोपरगाव शहराला 50 लाख रुपयांचा निधी मंजूर
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तालुक्यातील विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरवठा करीत आहे.
2. शिवभोजन थाळी पुन्हा पाच रुपयात
सरकारने शिव भोजन थाळी चा दर एक एप्रिल पासून दहा रुपये जाहीर केला होता. दरम्यान कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर हा दर पुन्हा पाच रुपये ठेवला आहे. गोरगरीब जनतेला पोटभर अन्न मिळावे, आणि यासाठी राज्य सरकारने शिवपूजन केंद्र सुरू केले आहेत.
3. कारची काच फोडून लॅपटॉप लांबवला
कार पार्किंग करून मंदिरात दर्शनासाठी गेलेले रमेश सावित्रा फड यांच्या कारची काच फोडून 42 हजाराचा लॅपटॉप चोरट्यांनी लांबवला.
4. पोलिस दलात मोठ्या फेरबदलाची शक्यता
दहा पोलीस निरीक्षकांसह एकोणवीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात मोठे फेर बदल अपेक्षित आहेत. कार्यकाळ संपलेल्या मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनील कटकेंसह महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
5. नगर जिल्ह्यात आढळली चार बिबट्याची पिले
श्रीरामपूर तालुक्यातील गाव परिसरात दोन आणि श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण मध्ये बिबट्यांची दोन अशी जिल्ह्यात चार पिल्ले आढळून आले आहेत.
6. प्लास्टिक विक्रेत्यांवर नगरपरिषदेची कारवाई
कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 40 किलो थर्माकोल प्लास्टिक जप्त करण्यात आला.
7. महिला तलाठ्यास मारहाण
बनावट शिधापत्रिका अहवाल तहसील समोर सादर केल्याच्या कारणावरून महिला तलाठी ला तिघांनी शिवीगाळ करून दमदाटी करून विटांनी मारहाण केली.
8. रात्रीच्या अंधारात बसविलेला पुतळा पोलिसांनी तात्काळ हटविला
गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व्हावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिक करत होते. त्यासाठी श्रीरामपुरात आंदोलनही झाले. काही शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या पहाटे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अचानक बसवला.
9. बेलापूर गावातील जनरलस्टोरला भीषण आग
आठ वाजेच्या सुमारास बेलापूर गावातील झेंडा चौकात मनोज यांच्या जनरल स्टोर ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दुकाना तील सर्व साहित्य जळून खाक झाला आहे. आग विझविण्यासाठी दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
10. खाजगी सावकारा विरुद्ध गुन्हा
कर्जत तालुक्यातील एका जणांच्या तक्रारीवरून महिलेसह एका सावकारा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना अटक करून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे स्वाती रामदास गोंडे रामदास कांतीलाल कुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
No comments
Post a Comment