Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - धक्कादायक : डॉक्टरकडून ऑक्सीजनचाही काळाबाजार!

No comments

  News24सह्याद्री -


कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रेमडीसीवर आणि ऑक्सीजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही आणि बेड मिळालेच तर ऑक्सीजन मिळायला तयार नाही. नगर शहरातील खासगी हॉस्पिटलला ऑक्सीजन न देता जिल्हा रुग्णालयात देण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील डॉक्टर्स हवालदिल झाले. याच अनुषंगाने आमदार संग्राम जगताप यांनी थेट आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, याच वेळी अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे ऑक्सीजनची निर्मिती करणारा एक खासगी प्लँट आहे. या प्लँटच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह नगर शहरातील हॉस्पिटलला ऑक्सीजनचा पुरवठा केला जातो. 

नेवासा तालुक्याच्या बाहेर ऑक्सीजन द्यायचे नाही आणि दिलेच तर तुमचा बेत पाहावा लागेल अशी धमकी कोणा गुंडाने नव्हे तर नेवाशामधील एका काळे नामक डॉक्टरने या प्लँट चालकाला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अत्यंत धक्कादायक असा एकूणच प्रकार आहे. डॉक्टरच धमकी देऊ लागले आहेत. जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार झालीय! नेवासामधील या डॉक्टरचा हेतू ऑक्सीजन सिलींडरचा काळाबाजार करणे हाच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. त्याला या प्रकरणात एका पत्रकारानेही मदत केल्याचे उघड झाले आहे. प्लँट चालकाने जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधल्यानंतर यावर पडदा पडला असला तरी या प्लँटमधील सर्व सिलींडर स्वत:च्या ताब्यात घेण्यामागे या डॉक्टरचा नक्की काय प्लँन होता हे आता जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तपासण्याची आवश्यकता आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *