शहराची खबरबात - नियम तोडणाऱ्यांकडून लाखांचा दंड वसूल
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांसमोर पोलिसांनी जोडले हात
कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. रोज तीन हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहे. प्रतिदिन सरासरी 40 जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी आहे. तरी देखील नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरतात. या नागरिकाना रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. तरीदेखील रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
२. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन
भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नगरमध्ये दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गांधी कुटुंबियांचे सांत्वन केले. ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले होते. पंकजा मुंडे यांनी गांधी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
3. मनपा कर्मचाऱ्यांचा येत्या २७ एप्रिलला बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा
अहमदनगर महापालिकेच्या कामगारांच्या बाबतीत राज्य सरकारने अन्यायकारक धोरण अवलंबले आहे त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीये याच धोरणाच्या विरोधात अहमदनगर कामगार युनियने एल्गार पुकारला आहे आपल्या अनेक मागण्यांसह राज्यसरकारच्या धोरणाविरोधात येत्या २७ एप्रिलला बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या कामगार युनियन ने महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिल आहे यासंदर्भातील निवेदनही त्यांनी महापौर आणि आयुक्त यांना दिल आहे.
4. भगवान
महावीर जयंती निमित्त योगासन आणि प्राणायमाची कार्यशाळा
भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक निमित्त नगर शहर धर्मजागरण समितीच्या वतीने दिनांक 25 एप्रिल 20२१ रोजी सकाळी साडेआठ वाजता ऑनलाईन योगासन कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेत औरंगाबाद येथील जनकल्याण समितीच्या योग केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर विवेक चर्जन मार्गदर्शन करणार आहेत या ऑनलाइन योगासन कार्यशाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्वसन प्रकार आणि योगासन प्रकार घेण्यात येणार आहेत.
5. राज्यात प्रावासाठी ई पास आवश्यक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या अंतर्गत राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत आणखी काही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत त्याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा इ पासची ती तरतूद करण्यात आली असून त्यासाठी रीतसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य आणि जिल्ह्यातील प्रवासासाठी सर्वसामान्यांना याची गरज आणि आवश्यकता लागणार आहे.
No comments
Post a Comment