शहराची खबरबात - अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीकडे सिमकार्ड
News24सह्याद्री - अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीकडे सिमकार्ड... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी कडे सिमकार्ड
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात असलेला आरोपी जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये उपचार घेत असताना त्याला मोबाइलचे सीमकार्ड पुरण्यात आले.या कैद्याला जिल्हा कारागृहात घेऊन जाण्यात आल्यानंतर त्याची झडती घेतली असता ते मिळून आले.
२. 24 तासात 55 बळी
कोरोनामुळे 24 तासात जिल्ह्यातील 55 जणांचा मृत्यू झालाय. शनिवारी रुग्ण संख्येत ने 3780 वाढ झाली. त्यामुळे उपचार असणाऱ्या रुग्णांची संख्या 23 हजार 302 झाली आहे. दरम्यान 3205 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीये. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 938 झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.93 टक्के.
३. भाजीपाला विभाग सुरू करण्याची मागणी
भाजीपाला फळे हे दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहेत. नगर शहरातील बाजार समिती भाजीपाला विभागात विक्रीस मुभा देण्यात यावी या मागणीचे निवेदन मार्केट कमिटी व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
४.बनावट धनादेश वाटवण्याचा प्रयत्न
दिल्ली म्युन्सिपल कौन्सिल या नावाने अडीच कोटींचा बनावट धनादेश वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून सावेडी येथील स्टेट बँक शाखेत हा प्रकार घडलाय.
५. त्या मृतांवर शहराबाहेर अंत्यविधी करा
जिल्हाभरात कोरोणा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढला आहे. जिल्ह्यात कुठेही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर नगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी रस्त्यावरच अंत्यविधी व्हावेत.
No comments
Post a Comment