शहराची खबरबात - बिले तपासणीसाठी २६ पथकांची नियुक्ती
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी ‘रोटरी’चा अतिशय संवेदनशील उपक्रम
कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून नगरच्या अमरधाममध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यांतील करोना मृतांवरही शासन निर्देशानुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम येथील कर्मचारी करीत आहेत.
२. सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार उघडकीस
अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या अँटीजेन चाचणी चा रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर मिळालाय. मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
३. आमदारांचा निधी उपचारासाठी
आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटीचा खर्च कोरोना बाधित रुग्णांवर केला जाणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीचा 15 टक्के निधी ही कोरोनावर खर्च केला जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.
४. घरफोडी करून दागिने चोरले
नगर शहरातील कापड बाजारातील परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीचे नाणे, जोडवे आणि तांब्याची भांडी असा एकूण सात हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. 13 ते 16 एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात स्वप्निल गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५. बिले तपासणीसाठी २६ पथकांची नियुक्ती
शासनाने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा वाढीव बिलांची आकारणी होत असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी बिलांच्या तपासणीसाठी 32 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या 26 पथकांची नियुक्ती केली आहे.
No comments
Post a Comment