शहराची खबरबात - नियंत्रण कक्ष तक्रारींकडे कोणाचेही लक्ष नाही
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. वैद्यकीय यंत्रणा व्हेंटिलेटरवर
ऑक्सीजन नसल्याने रुग्णालयाने नातेवाईकांना अलर्ट दिला आहे प्रयत्न करूनही ऑक्सिजन मिळत नसल्याने काही खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात च्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
2. घराचे बांधकाम करणाऱ्यास दहा हजारांचा दंड
प्रशासनाने कोरोना संदर्भात लागू केलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत मजूर लावून घराचे बांधकाम करण्यास तोफखाना पोलिसांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे शहरातील सावेडी परिसरातील कॉटेज कॉर्नर येथे ही कारवाई करण्यात आली तोफखाना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पथकासह गस्त घालत नियम तोडणाऱ्यान्वर कारवाई केली.
3. नगरला 2 विद्युतदाहिन्यांसाठी निधी हवा
जिल्हा भरातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी नगर शहरात दाखल होत असून मयतांची संख्याही वाढली आहे त्यामुळे अमरधाम येथील यंत्रणेवर ताण येत असून केडगाव व रेल्वे स्टेशन येथील स्मशानभूमीसाठी विदयुतदाहिन्या बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे
4. नियंत्रण कक्ष तक्रारींकडे कोणाचेही लक्ष नाही
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण व मदत पुनर्वसन शाखेच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
5. जीवनावश्यक वस्तूंसाठी केवळ चार तासच मुभा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यू चे नियम कडक करण्याचा निर्णय झाला त्यानंतर या जनता कर्फ्यू ची रविवारी रात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली जीवनावश्यक वस्तूंसाठी केवळ चार तासाचीच मुभा देण्यात आली आहे.
No comments
Post a Comment