Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मनपाच्या जागेत ऑक्सिजन प्लांटसाठी प्रयत्न

No comments

  News24सह्याद्री -




TOP HEADLINES


1. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी डिस्चार्ज  अहमदनगर: जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना 

 रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८७२७ इतकी झाली आहे.

2. एटीएम तोडून पन्नास हजारांची चोरी
नगर शहरातील बुरूडगाव रोड भागात होटेल वैभव शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीन चे लॉक तोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयांची चोरी केली. ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली. 

3. दुकानाचे पत्रे उचकटून चोरी
 एमआयडीसी भागात असलेल्या निंबळक चौकात रात्रीच्या सुमारास दुकानाचे पत्रे काढून साहित्याची चोरी करण्यात आली. ही घटना 15 एप्रिल रोजी घडली. याबाबत मयुरेश बाबासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

4. मनपाच्या जागेत ऑक्सिजन प्लान्टसाठी प्रयत्न
शहरातील रुग्णांवर उपचारासाठी ऑक्‍सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. नगर शहरामध्ये मनपाच्या जागेमध्ये ऑक्सिजनचा प्लान्ट उभारण्यासाठी परवानगी आणि निधीची मागणी करणार आहे.

5. नगरला तातडीने ऑक्सिजन द्या   
शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत नगरला तातडीने ऑक्सिजन द्या, अशा मागणीचे पत्र शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. रेमडिसिवीर इंजेक्शनचे वाटप करताना राजकीय हस्तक्षेप होत असून प्रशासन दबावाखाली या इंजेक्शनचे वाटप करीत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *