मोठी बातमी - थोरात अडवे आले नसते तर नगरमध्ये अनेकांचे गेले असते जीव
News24सह्याद्री -
ऑक्सीजनच्या मुद्यावर रणकंदन पेटले! अनेकांचा जीव टांगणीला लागला. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक देवाचा धावा करू लागले आणि संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आता पुढे काय होणार या चिंतेत पडले. या विषयाच्या अनुषंगाने न्यूज २४ सह्याद्रीने अत्यंत खमकी भूमिका घेतली. नगरमधील ऑक्सीजनची गंभीर समस्या उचलून धरताना या विषयाकडे थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापासून जिल्हाधिकारी आणि पोपटराव पवार यांचे लक्ष वेधले. त्यानंतर रात्री उशिरा नगरमध्ये दोन टँकर दाखल झाले आणि आज सकाळी त्यामाध्यमातून बहुतांश हॉस्पिटलला ऑक्सीजनचा पुरवठा झाला. मात्र,
नगरला जे टँकर आले ते सहजासहजी आले नाही! हे टँकर पुणे जिल्ह्यातील शिरुर हद्दीत येताच त्यांना अडविण्यात आले आणि ते पुण्याकडे घेऊन जाण्याचा आग्रह सुरू झाला. ही बाब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर थोरातांनी काय केले याबाबतची माहिती आमचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी फोनोद्वारे मंत्री थोरात यांच्याकडून घेतलीय.
No comments
Post a Comment