शहराची खबरबात - घाटात प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
News24सह्याद्री - घाटात प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद... पहा शहराची खबरबात मध्ये
1. याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
महापालिकेकडून प्रास्ताविक असलेल्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया करून उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रखडली आहे. खाजगी संस्थेमार्फत संपूर्ण शहरात एलईडी बसवणे आणि त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याचं काम प्रस्तावित आहे. याबाबत आलेल्या दोन निविदांपैकी एक निविदाकाराची निविदा मनपाने नाकारले आहे.
2. शहरा2त लसीकरण केंद्राची संख्या वाढणार
मनपाकडून सध्या 7 आरोग्य केंद्रासह एका वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण सुरू आहे. मात्र एक मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने वाढती गर्दी लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी दिली.
3. इस्टेट ब्रोकर वर प्राणघातक हल्ला
प्लॉट मध्ये अवैध दारू विक्री मनाई केल्याने पाच जणांनी स्टेट ब्रोकर वर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले.याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र वामन सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम भोकरे, दशरथ पालवे आणि इतर तिघांन विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
4. घाटात प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
तसेच निर्जन ठिकाणी प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले विकास बाळू हनवत करण नवनाथ शेलार या दोघांसह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.
5. नगरकरांनी पाणी जपून वापरावे
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महानगरपालिकेच्या पाणीपुवठा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगर शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे बुधवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह परिसरामध्ये पाऊस झाल्याने आणि यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे नगर शहरात येणाऱ्या पाणीपुरवठा वर परिणाम झाला आहे.
6. शहरात अद्यापही ऑक्सीजन तुटवडा
अहमदनगर शहरात अद्यापही ऑक्सीजन तुटवडा भासत असून वारंवार ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असेल तर सांगत आहे मात्र पुन्हा बुधवारी मध्यरात्री अनेक हॉस्पिटलच्या ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने डॉक्टरांचे धावपळ उडाली होती ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या सेंटरवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून दोन-दोन दिवस ऑक्सिजन साठा मिळत नसल्याने डॉक्टरांसमोर मोठा हे प्रश्न निर्माण झाले आहेत प्रशासनाचा दावा करत असूनही प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न आता डॉक्टर करत आहेत.
No comments
Post a Comment