मोठी बातमी - थरारक घटना ... पॉईंटमन ठरला देवदूत
News24सह्याद्री -
अंध महिलेचा मुलगा पडला रेल्वेरुळावर; समोर एक्सप्रेस ट्रेन तरीही तो वाचला! रायगड जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना वांगणी रेल्वे स्टेशनवर घडलीय. समोर एक्सप्रेस ट्रेन आणि त्याचवेळी प्लॅटफॉर्मवरुन पायी चालत असलेल्या अंध महिलेच्या हातातील मुलगा कडेल जातो आणि त्याचा तोल जाऊन तो थेट रेल्वेरुळावर पडतो. काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिलं.
एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतलं. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले. काळजाचा ठोका चुकला ना! होय रेल्वेच्या सीसीटीव्हीमध्ये सदरची घटना पाहून आपणा सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला असणार! पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments
Post a Comment