गॉसिप कल्ला - सध्या शिव ठाकरे या व्यक्तीच्या प्रेमात..!
News24सह्याद्री - सध्या शिव ठाकरे या व्यक्तीच्या प्रेमात... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. नवाजुद्दीन सिद्दीकी गायकाच्या रूपात
अभिनेता नवाझजुद्दिन सिद्दिकी अभिनयाबरोबरच आता एका गायकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच नवाजने त्याचा आगामी चित्रपट 'बोले चूड़िया'मधील 'स्वैगी चूड़िया' हे गाणं प्रदर्शित केल असून या गाण्यातून त्याने गायन क्षेत्रात प्रदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी नवाजचा म्यूजिक अल्बम 'बारीश की जाये' प्रदर्शित करण्यात आला होता.
२. जयदीपची खरी बायको आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री..!
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजेच त्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री असून मंदारच्या पत्नीच नाव मितिका शर्मा जाधव असे आहे.
३. बाबो...! सध्या शिव ठाकरे या व्यक्तीच्या प्रेमात..!
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरेने या सीझनमधून खूप लोकप्रियता मिळवली. या शोदरम्यान विणा आणि शिवमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र आता शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. आता पुन्हा शिव ठाकरे पडलाय प्रेमात हे त्याने सोशल मीडिया माध्यामातून सांगितले आहे.
४. अभिनेता चिरंजीवी सिनेकर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना देणार मोफत लस!
अभिनेता चिरंजीवी हा समाजसेवा करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. आता तो पुन्हा एकदा खूप चांगले काम करत असून कोरोनाचा प्रार्दुभावामुळे आता चिरंजीवीने सिने कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना मोफत लस देण्याची घोषणा केली असून .चिरंजीवीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे.
५ एक लाजरा न साजरा मुखडा, तेजस्विनी पंडीतच्या या फोटोला कॅप्शन सुचवा!
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असून आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. तेजस्विनीचा एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतोय.
No comments
Post a Comment