सुशांत सिंह राजपूतची 'ती' शेवटची पोस्ट बहिणीने पुन्हा केली शेअर, वाचा
मुंबई -
गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आता वर्ष पूर्ण होणार आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने आता आपल्या भावाची शेवटची पोस्ट शेअर केली असून, यासह तिने आपली व्यथादेखील व्यक्त केली आहे. श्वेताने सुशांतच्या शेवटच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात सुशांतने त्याच्या आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे, धुरकट भूतकाळ साश्रू डोळ्यांनी अदृश्य होत आहे. अपूर्ण स्वप्ने हास्याची कमान तयार करत आहेत. लवकरच संपणार हे आयुष्य दोन्हीमध्ये सौदेबाजी करत आहे. सुशांतची ही पोस्ट शेअर करताना श्वेताने लिहिले की, भाईची शेवटची पोस्ट. तो मला पुन्हा दिसणार नाही, हे मला कळल्यावर माझ्या मनाला खूप दुःख होतं. हे दुःख मला आतून मोडकळीस आणतं, आमचे तुकडे तुकडे होतात. आम्ही जितके अधिक तुकडे गोळा करण्याचा प्रयत्न करतो तितकेच ते एक अशक्य काम आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या जीवनावर आधरित 'न्याय' हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सुशांतचे वडील केके सिंग यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात केवळ चित्रपटाचे शीर्षकच बदलले नाही, तर निर्मात्यांनीही सुशांतच्या जीवनाची कहाणी सांगितली आहे. या चित्रपटाचे नवीन शीर्षक आता 'शशांक' असे करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत यांचे वडील केके सिंग यांनी कोर्टात हा खटला दाखल केला होता की, या चित्रपटाचे निर्माते आपला मुलगा आणि कुटुंबाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा फायदा घेऊन, त्याच्या चित्रपटाचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात कोर्टाने त्यांना नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपये दिले. इतक्या मोठ्या नुकसानभरपाईमुळे या चित्रपटाचे निर्माते इतके घाबरले की, त्यांनी या चित्रपटाचे शीर्षकच बदलले नाही, तर सुशांतचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचा निर्वाळा कोर्टात दिले आहे. या, ट्रेलरमध्ये नमूद केलेली घटना सुशांतच्या प्रकरणांशी बरीचशी संबंधित आहे. जेव्हा आपण या चित्रपटाचा ट्रेलर पाहता तेव्हा, ही संपूर्ण घटना तुमच्यापर्यंत ज्या प्रकारे आपण आतापर्यंत माध्यमात सुशांतच्या प्रकरणाविषयी ऐकली आहे त्याप्रमाणेच डोळ्यासमोर येईल. परंतु, आता हे प्रकरण कोर्टासमोर आल्यानंतर त्याची कथा पूर्णपणे बदललेली दिसते आहे.
No comments
Post a Comment